विमानात प्रवाशाचं बेशिस्त वर्तन! बांगलादेशी प्रवाशाने विमानात केले हस्तमैथुन, मुंबईत पोलिसांनी केली अटक!

विस्तारा एयरलाईनच्या मस्कत ते मुंबईच्या विमान प्रवासादरम्यान बांगलादेशी नागरिकाने फ्लाइट अटेंडंटसोबत हस्तमैथुन आणि अश्लील कृत्य केल्याचा आरोप आहे.

    विमान प्रवासात अनेकदा अजब गजब गोष्टी घडताना आपण पाहतो. कधी कुणी प्रवासी सहप्रवासासोबत क्षुल्लक कारणावरुन (Bangladeshi Passenger Masturbate In Plane) भांडतो किंवा कधी फ्लाईटमधे कुणी प्रवासी क्रू मेम्बरसोबत गैरवर्तन करतो. गेल्या काही दिवसापासून अशा घटना सातत्याने घडताना दिसत आहेत. आता एका प्रवाशाने विमानात हस्तमैथुन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी एका बांगलादेशी नागरिकाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले, तेथून त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

    नेमका प्रकार काय?

    मिळालेल्या माहितीनुसार, विस्तारा एयरलाईनच्या मस्कत ते मुंबईच्या विमान प्रवासादरम्यान बांगलादेशी नागरिकाने फ्लाइट अटेंडंटसोबत हस्तमैथुन आणि अश्लील कृत्य केल्याचा आरोप आहे. या आरोपावरून पोलिसांनी आरोपी मोहम्मद दुलाल (३०) याने हा गुन्हा दाखल केला आहे. . दुलालला गुरुवारी अंधेरी न्यायालयात हजर करण्यात आले असून सहार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

    फ्लाइट अटेंडंटच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

    सहार पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, दुलालला 22 वर्षीय फ्लाइट अटेंडंटच्या तक्रारीच्या आधारे तिला मिठी मारून तिचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केल्याबद्दल अटक करण्यात आली. यावेळी मध्यस्थी करताना फ्लाइट निरीक्षक आणि फ्लाईटमधील इतर प्रवाशांवरही त्याने हल्ला केला. कॅप्टनचे लाल चेतावणीचे पत्र वाचून त्याने ऐकले नाही आणि इशारे न पाळल्यामुळे त्याला अनियंत्रित प्रवासी घोषित करण्यात आले. पोलिसांनी बांगलादेशच्या वाणिज्य दूतावासाला कळवले आहे, जे शुक्रवारी त्याच्या जामीन आणि प्रकरणाशी संबंधित इतर प्रक्रियांची व्यवस्था करेल.

    प्रवाशांच्या बेशिस्त वर्तनाची घटनेत वाढ

    मुंबईत प्रवाशांच्या बेशिस्त वर्तनाची ही काही पहिली घटना नाही.  2023 मधील मुंबईतील प्रवाशांच्या बेशिस्त वर्तनाची ही 12वी घटना आहे. 2017 ते 2023 या कालावधीत एकूण 23 गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान, दुलालचे वकील प्रभाकर त्रिपाठी यांनी न्यायालयात युक्तिवाद केला की, दुलाल हा मानसिक विकाराने ग्रस्त असून तो इंग्रजी आणि हिंदी बोलत नाही. न्यायालयाने आरोपी दुलालला शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.