मणिपूर हिंसाचाराचा विरोध करुन परतणाऱ्या युवतीसोबत रॅपिडो चालकाचं घाणरेडं कृत्य, धावत्या बाईकवर…नंतर मेसेजही केले

बंगळुरुमधील एका महिलेने रॅपिडो चालकावर दुचाकीवर हस्तमैथुन केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे.

    बंगळुरु : देशभरात मणिपूरमधील महिलांवर झालेल्या अत्याचार (Manipur Sexual Violence) प्रकरणाविषयी संतापाची लाट उसळली आहे. मोर्चे, आंदोलनाच्या माध्यमातून संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यातून या प्रकरणाचा निषेध करण्यात येत आहे. बंगळुरुमध्येही (Bangalore) एक तरुणी मणिपूर प्रकणावरील निषेध आंदोलनात सगभागी होऊन परत येत असताना लैंगिक छळाला बळी पडल्याच घडना घडली आहे. आंदोलस्थळावरुन परत येत येताना रॅपिडो दुचाकी स्वाराने भर रस्त्यात हस्तमैथुन केल्याचा आरोप (Rapido Driver Masterbated During ride) या तरुणीनं केला आहे.

    नेमकं काय घडलं

    बंगळुरुमधील एका महिलेने ट्विटरवर (twitter Post) एक पोस्ट शेयर करत तिच्यासोबत घडलेल्या गैरप्रकारबद्दल सांगितलं आहे. शुक्रवारी बंगळुरुतील टाऊन हॅाल परिसरात मणिपूर हिंसाचाराच्या विरोध प्रदर्शनात ही महिला सहभागी झाली होती. त्यानंतर घरी जाण्यासाठी तिने रॅपिडो बुक केली. यावेळी आलेल्या दुचाकी चालकाने प्रवासादरम्यान, फार वर्दळ नसलेल्या ठिकाणी पोहचताच एका हाताने दुचाकी चालवत दुसऱ्या हाताने हस्तमैथुन करण्यास सुरुवात केली. मात्र, मी माझ्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पूर्ण वेळ शांत राहिले. मी त्याला माझ्या घरापासून 200 आधी सोडण्यास सांगितले

    रॅपिडो चालकाने केले मेसेज

    मी घरी आल्यानंतर त्याने मला व्हॅाट्सअॅपवर मेसेजही केल्याचा आरोप या तरुणीने केला. हाय… आय लव्ह यू असे मेसेज आल्याचे तिने पोस्टमध्ये सांगितले. त्यानंतर घाबरुन मी त्याला ब्लॅाक केले. तरुणीने या मेसेजचा स्क्रिनशॅाटही ट्विटरवर शेअर केला आहे. दरम्यान तिचे ट्विट व्हायरल होताच पोलीसही अॅक्टिव्ह होत काही वेळातच आरोपीला अटक करण्यात आली.