बँक कर्मचाऱ्याने ३४ कोटी लुटले; मनी हाईस्ट वेब सीरिज पाहून कर्म

मनी हाईस्ट वेबसीरिज पाहून बँकेतील सुरक्षा यंत्रणेच्या त्रुटी हेरल्या आणि संधी मिळताच डाव साधला. जुलै महिन्यात डोंबिवली एमआयडीसी परिसरात असलेल्या आयसीआयसीआय बँकेतून १२ कोटींची रक्कम चोरी झाल्याची घटना उघड झाली होती. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला होता.

    डोंबिवली : एमआयडीसी (MIDC) भागात असलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या (ICICI Bank) तिजोरीतून १२ कोटी रुपये लंपास करणाऱ्या टोळीच्या सूत्रधाराला पकडले आहे. मानपाडा पोलिसांनी (Manpada Police) इसरार कुरेशी, अहमद खान आणि अनुज गिरी या तिघांना पोलिसांनी अटक केली होती. या टोळीचा मुख्य सूत्रधार बँक कस्टोडियन (Bank Custodian) अल्ताफ शेखसह त्याची बहिण निलोफरला अटक करण्यात आले आहे.

    मनी हाईस्ट वेबसीरिज पाहून त्याने बँकेतील सुरक्षा यंत्रणेच्या त्रुटी हेरल्या आणि संधी मिळताच डाव साधला. जुलै महिन्यात डोंबिवली एमआयडीसी परिसरात असलेल्या आयसीआयसीआय बँकेतून १२ कोटींची रक्कम चोरी झाल्याची घटना उघड झाली होती. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला.

    या बँकेत काम करणाऱ्या कॅश मॅनेजर अल्ताफ शेख याने आपल्या काही साथीदारांसह ही रक्कम चोरली होती. पोलीस या टोळीच्या मागावर होते. या प्रकरणात पोलिसांनी इसरार कुरेशी, अहमद खान आणि अनुज गिरी या तिघांना ऑगस्टमध्ये अटक केली. अल्ताफ शेख याने मनी हाईस्ट (Money Hiest) ही वेब सीरिज पाहून त्याला चोरीची कल्पना सुचली. त्याने झटपट श्रीमंत होण्याचा नादात स्वतः काम करत असलेल्या बँकेत चोरीचा प्लॅन आखला. तो कॅश कस्टोडियन मॅनेजर असल्याने त्याला बँकेविषयी सर्व माहिती होती.

    बँकेच्या सुरक्षा यंत्रणेमध्ये असलेली कमतरता त्याने हेरली. हा प्लॅन यशस्वी करण्यासाठी त्याने त्याचे मित्र इसरार कुरेशी, अहमद खान आणि अनुज गिरी यांची मदत घेतली. ९ जुलैला सुट्टीच्या दिवशी बँकेचे अलार्म निष्क्रिय करत सर्व कॅमेऱ्यांच्या हार्डडिस्क काढून त्याने तिजोरीतून ३४ कोटी रुपये लंपास केले. हे पैसे त्याने एसीच्या डक्टमधील छिद्रातून बँकेच्या इमारतीच्या मागील बाजूस बांधलेल्या ताडपत्रीवर फेकून दिले. यानंतर बँकेतील सीसीटीव्हीचा डीव्हीआर गहाळ असल्याची माहिती बँकेच्या वरिष्ठांना देऊन तिजोरीतील रक्कम तपासणी करण्याचे पथक बँकेत बोलावले.