
अंमलबजावणी संचालनालयाने सट्टेबाजी सिंडिकेटच्या कमाईतून भारतीय शेअर बाजारातील गुंतवणुकीशी संबंधित 417 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
नवी दिल्ली : देशातील दिग्गज उद्योगपतींच्या कुटुंबीयांच्या लग्नसमारंभात पाण्यासारखा पैसा ओतला जातो. बॅालिवूड सेलेब्रिटिंना (Bollywood Celebrity) खास पर्फार्मन्स साठी बोलवण्यातं येत. श्रीमंताच्या घरी लग्नकार्याला असा थाट होणं काही नवीन नाही. मात्र, छत्तीसगडच्या भिलाई येथील बेटिंग ॲपचा प्रवर्तक सौरभ चंद्राकर सारखा सामन्य व्यक्तिने त्याच्या लग्नात चक्क 200 कोटी रुपये खर्च केले असतील तर ती नक्कीय चर्चेची बाब आहे. महादेव बेटिंग अॅप चालवणाऱ्या या व्यक्तिच्या मागे आता ईडिची (ED)पिडा लागली आहे. ईडीने गुरुवारी महादेव अॅपशी जोडलेल्या ३९ ठिकाणी छापे टाकले आणि ४१७ कोटी रुपयांचे शेअर्स आणि इतर मालमत्ता जप्त केली. नेमकं हा सगळा प्रकार काय आहे, जाणून घ्या.
नेमका प्रकार काय?
भिलाई येथील बेटिंग ॲपचा प्रवर्तक सौरभ चंद्राकर मनी लाँड्रिंग प्रकरणात अडकला आहे. त्याने कथितपणे त्याच्या स्वत: च्या भव्य लग्नासाठी 200 कोटी रुपये रोख खर्च केले, ज्यात खासगी जेट भाड्याने घेणे आणि सेलिब्रिटी परफॉर्मन्सचा समावेश आहे. अंमलबजावणी संचालनालयाने सट्टेबाजी सिंडिकेटच्या कमाईतून भारतीय शेअर बाजारातील गुंतवणुकीशी संबंधित 417 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. इतकं नव्हे तर नागपुरातून नातेवाईक आणि सेलिब्रिटींना आणण्यासाठी त्यांनी खासगी विमाने पाठवली. हे सर्व व्यवहार रोखीने झाले. ईडीच्या तपासात ही बाब समोर आली आहे. एजन्सीने गुरुवारी महादेव ॲपशी जोडलेल्या ३९ ठिकाणी छापे टाकले आणि ४१७ कोटी रुपयांचे शेअर्स आणि इतर मालमत्ता जप्त केली.
लग्नात अनेक बडे स्टार्स झाले होते सहभागी
सौरभ चंद्राकर त्याचा पार्टनर रवी उप्पलसोबत महादेव बुकिंग ॲप चालवतो. सध्या त्याच ॲप, ऑनलाइन बेटिंग प्लॅटफॉर्म, ईडी तसेच विविध राज्यांच्या पोलिसांच्या चौकशीच्या रडारवर आहे. सौरभने युएईमध्येच त्याचे लग्न आयोजित केले होते, ज्यामध्ये चित्रपट कलाकारांना खासगी जेटने परफॉर्म करण्यासाठी नेले होते. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, या लग्नाला टायगर श्रॉफ, सनी लिओन, नेहा कक्कर, आतिफ अस्लम, राहत फतेह अली खान, अली असगर, विशाल ददलानी, एली अवराम, भारती सिंग, भाग्यश्री, कीर्ती खरबंदा, नुसरत भरूच, कृष्णा अभिषेक, कृष्णा अभिषेक आदी उपस्थित होते. सुखविंदर सिंग आदी मान्यवर सहभागी झाले होते. ईडीने गोळा केलेल्या पुराव्यानुसार, इव्हेंट कंपनीला 112 कोटी रुपयांचे पेमेंट हवालाद्वारे करण्यात आले होते. तर हॉटेल बुकिंगसाठी 42 कोटी रुपये रोख देण्यात आले.