big breaking suspicious object explodes in running kushinagar superfast express train suspicious bag holder missing in chalisgaon one injured nrvb

संशयित बॅग जप्त करीत पाचोरा स्थानकांवरील जीआरपी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली असून अधिक तपास सुरू असल्याचे धावत्या रेल्वेमधील सुरक्षा कर्मी पोलीस निरीक्षक सुनीलकुमार सिंग आणि पाचोरा जीआरपी पोलिसांनी सांगितले.

जळगाव : मनमाड ते चाळीसगाव (Manmad To ChalisGaon) दरम्यान कुशीनगर सुपरफास्ट एक्सप्रेस (Kushinagar Superfast Express) धावत्या ट्रेनमध्ये एका सॅकमध्ये (पाठीवर टांगण्याची बॅग) संशयास्पद वस्तूचा (Suspicious Object) स्फोट झाला. यात अजय अशोक मगरे (Ashok Magare) नामक २५ ते ३० वर्षीय युवक जखमी झाल्याची घटना घडली. मात्र संशयित बॅगधारक व्यक्ती चाळीसगाव येथेच पसार झाल्याचे प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले.

संशयित बॅग जप्त करीत पाचोरा स्थानकांवरील जीआरपी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली असून अधिक तपास सुरू असल्याचे धावत्या रेल्वेमधील सुरक्षा कर्मी पोलीस निरीक्षक सुनीलकुमार सिंग आणि पाचोरा जीआरपी पोलिसांनी सांगितले.

मध्य रेल्वेच्या लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकावरून गोरखपूर कडे जाणारी (गाडी क्रमांक २२५३८ डाऊन) कुशीनगर सुपर फास्ट एक्सप्रेसच्या इंजिनपासून चौथ्या अनारक्षित डब्यात एका संशयित बॅगमधील घातक वा रासायनिक पदार्थाचा स्फोट झाल्याची घटना शनिवारी सकाळी ६.३० ते ७.३० वाजेदरम्यान मनमाड ते चाळीसगाव मध्य रेल्वे स्थानकादरम्यान घडली.

या स्फोटात एक जण जखमी झाला असून त्या प्रवाशासोबत अन्य दोन व्यक्ती पाचोरा येथे उतरविण्यात आले. धावत्या रेल्वेतील सुरक्षा पथकातील पोलीस निरीक्षक सुनील कुमार सिंग यांच्या पथकाने संशयित बॅग जप्त करत या तिन्ही व्यक्तींचे जाब जबाब नोंदवण्यासाठी पाचोरा जीआरपी पोलिसांकडे सोपविण्यात आले.