big news climax of brutality in talasari taluka minor girl was raped and killed shocking incident read in detail nrvb
प्रतिकात्मक फोटो

रमेश दुबळा हा या मुलीच्या शेजारी राहत असून घरगुती वादातून तिचा खून केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे घरगुती वादा सोबत आर्थिक देवाणघेवाणीवरूनही त्याचे वाद होते असे बोलले जात आहे वाद झाल्याचा राग मनात धरून दुबळा या अल्पवयीन मुलीला आपल्या मोटरसायकलवर घेऊन गेला.

पालघर : एका ४५ वर्षीय इसमाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Minor Girl Rape) करून तिचा गळा दाबून खून केल्याची (Murdered by Strangulation) घटना पालघर (Palghar) जिल्ह्यातील तलासरी (Talasari) तालुक्यात घडली आहे अवघ्या काही तासात तलासरी पोलिसांनी (Talasari Police) आरोपी रमेश दुबळा याला अटक केली आहे (Accused Ramesh Dubla has been arrested).

रमेश दुबळा हा या मुलीच्या शेजारी राहत असून घरगुती वादातून तिचा खून केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे घरगुती वादा सोबत आर्थिक देवाणघेवाणीवरूनही त्याचे वाद होते असे बोलले जात आहे वाद झाल्याचा राग मनात धरून दुबळा या अल्पवयीन मुलीला आपल्या मोटरसायकलवर घेऊन गेला व तिच्या घराच्या पाच ते सहा किलोमीटर परिसराच्या शाळेजवळ त्याने तिचा बलात्कार केला व त्यानंतर गळा दाबून खून केला अशी कबुली त्याने पोलिसांकडे दिली आहे.

बुधवारी रात्री दहा वाजता ती हरवल्याची तक्रार तिच्या आई-वडिलांनी तलासरी पोलीस ठाण्यात दिल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे ही बाब पोचली ही गंभीर बाब लक्षात घेत त्यांनी तलासरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय वसावे यांच्या नेतृत्वाखाली पथके तयार केली व शोध मोहीम राबवायला सांगितले त्यानुसार वसावे व त्यांच्या पथकाने तपासचक्र फिरवून या खुन्याला ताब्यात घेतले आहे त्याच्यावर तलासरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून खून केलेल्या मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.