बुलडाण्यातील प्रसिद्ध पतसंस्थेत कोट्यावधींचा घोटाळा; संचालक मंडळाला बुलडाणा CID कडून अटक

सहकारमित्र चंद्रकांत हरी बढे पतसंस्थेचे संस्थापक चंद्रकांत बढे यांच्यासह संचालक मंडळाला बुलडाणा सीआयडीच्या पथकाने अटक केली आहे. सादर पतसंस्थेच्या शाखा संपूर्ण राज्यभरात असून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप या संचालक मंडळांवर आहे. राज्यभर कार्यक्षेत्र असलेल्या या पतसंस्थेतील घोटाळ्यांबाबत अनेक ठिकाणी गुन्हे दाखल असल्याने संचालक मंडळा विरोधात अटक वॉरंट निघाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या पतसंस्थेत कोट्यावधीचा गैरव्यवहार झाल्याचा अहवाल लेखापरिक्षकांनी दिला होता(Board of Directors arrested by Buldana CID in multi-crore scam).

    बुलढाणा : सहकारमित्र चंद्रकांत हरी बढे पतसंस्थेचे संस्थापक चंद्रकांत बढे यांच्यासह संचालक मंडळाला बुलडाणा सीआयडीच्या पथकाने अटक केली आहे. सादर पतसंस्थेच्या शाखा संपूर्ण राज्यभरात असून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप या संचालक मंडळांवर आहे. राज्यभर कार्यक्षेत्र असलेल्या या पतसंस्थेतील घोटाळ्यांबाबत अनेक ठिकाणी गुन्हे दाखल असल्याने संचालक मंडळा विरोधात अटक वॉरंट निघाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या पतसंस्थेत कोट्यावधीचा गैरव्यवहार झाल्याचा अहवाल लेखापरिक्षकांनी दिला होता(Board of Directors arrested by Buldana CID in multi-crore scam).

    बुलढाणा सीआयडीच्या एका पथकाने काल या पतसंस्थेच्या संचालक मंडळातील आरोपी चंद्रकांत हरी बढे, राजेंद्र विश्वनाथ चौधरी, भागवत मुरलीधर पाटील, बळिराम केशव माळी, गोविंद ज्ञानेश्वर मांडवगणे, भिकू शंकर वंजारी, विजय गणपत वाघ या सात संचालकांना वरणगाव येथून अटक करून बुलढाण्यात आणले. तर आरोपींना बुलडाणा जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

    विशेष लेखा परीक्षण विभागाने पतसंस्थेचे ऑडिट करून संस्थापक अध्यक्षांसह तत्कालीन संचालक तसेच कार्यकारी अधिकाऱ्यांवर गैरव्यवहाराचा ठपका ठेवला होता. पतसंस्थेच्या पालघर, पुणे, सांगवी, सांगली यासह बुलडाणा जिल्ह्यतील असलेल्या शाखेत अपहार झाल्याची नोंद आहे. तसेच इतर शाखेत सुद्धा अपहार झालेला आहे.

    या प्रकरणी बढेंसह तत्कालीन संचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्याचप्रमाणे याप्रकरणाची सीआयडी चौकशी देखील सुरू होती. गेल्या सात ते आठ वर्षांपासून बढे पतसंस्थेच्या ठेवीदारांना ठेवीची रक्कम परत मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे पतसंस्थेवर शासक नियुक्त करण्यात आले होते. पतसंस्थेतील कार्यकारी अधिकारी मधुसूदन पाटील यांनी देखील अपहाराबाबत तक्रार केलेली आहे.