जालना शहर बॉम्बने उडवू! इसिसची धमकीमुळे खळबळ; वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याच्या फोनवर आला मेसेज

इसिस या दहशतवादी संघटनेत काम करत असल्याचे सांगत जालना शहराला बॉम्बने उडवून देण्याची वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याला व्हॉटस अॅप मॅसेजच्या माध्यमातून धमकी देण्यात आली. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याचे नाव आणि फोटो वापरून व्हॉटस अँपच्या माध्यमातून ही धमकी देण्यात आली. शेख अतिक शेख आयुब असे या कार्यकर्त्याचे नाव असून त्यांच्याच व्हॉटस अँपवर मॅसेज करून ही धमकी दिली आहे(Bomb threat to Jalna city sparks ISIS threat; A message came on the phone of a deprived Bahujan Aghadi activist).

    जालना : इसिस या दहशतवादी संघटनेत काम करत असल्याचे सांगत जालना शहराला बॉम्बने उडवून देण्याची वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याला व्हॉटस अॅप मॅसेजच्या माध्यमातून धमकी देण्यात आली. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याचे नाव आणि फोटो वापरून व्हॉटस अँपच्या माध्यमातून ही धमकी देण्यात आली. शेख अतिक शेख आयुब असे या कार्यकर्त्याचे नाव असून त्यांच्याच व्हॉटस अँपवर मॅसेज करून ही धमकी दिली आहे(Bomb threat to Jalna city sparks ISIS Threat; A message came on the phone of a deprived Bahujan Aghadi activist).

    ‘मै शेख अतिक शेख अय्युब. एक सुसाईड बॉंबर हू. मै इसीस के साथ काम करता हू. जालना शहर मे 7 मई को बॉंब फोडने वाला हू. महाराष्ट्र जालना पुलिस रोख सकते है तो रोख ले. मैने लोन चुराके पैसा जमा करके बॉंब बनाया है’ असा संदेश आला.

    मसेज पाहून शेख अतिक शेख आयुब यांनी तातडीने बदनापूर पोलिस ठाणे गाठले. व्हॉटसअॅपवर अशा प्रकारे मॅसेज करून अज्ञात आरोपीने अब्रुनुकसान केली अशी तक्रार त्यांनी दाखल केली. त्यांनी तक्रारीवरून बदनापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी सायबर सेल पोलिस अधिक तपास करत आहेत. पोलिस तपासादरम्यान हा मॅसेज आंध्रप्रदेशमधून आल्याचे समोर आले.