मुंबई पुन्हा हादरली; लोअर परळमध्ये १५ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार, तिघा अल्पवयीनांचा समावेश

मुंबई पुन्हा सामूहिक अत्याचाराच्या घटनेने हादरली. लोअर परळ येथे एका १५ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. यातील एका आरोपीसोबत पीडितेचे प्रेमसंबंध असल्याचे सांगण्यात येत आहे.

    मुंबई : लोअर परळमध्ये (Lower Parel) एका १५ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार (Gang Rape) करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शुक्रवारी मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. धक्कादायक म्हणजे सहा आरोपींमधील तिघे अल्पवयीन (Minor) आहेत. पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात (Arrested) घेतले असून अल्पवयीन आरोपींना बालसुधारगृहात (Juvenile Reformatory) पाठवण्यात आले आहे.

    मुंबई पुन्हा सामूहिक अत्याचाराच्या घटनेने हादरली. लोअर परळ येथे एका १५ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलीस (N.M.Joshi Police) ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. यातील एका आरोपीसोबत पीडितेचे प्रेमसंबंध असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेतील आरोपींमध्ये तीन अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. तरुणाने वरळी येथून मुलीला लोअर परळ येथील घरी आणले. तिथे आरोपींनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केले. ज्या तरुणाने तिला घरी आणले, त्याच्यासोबत पीडितेचे प्रेमसंबंध होते, अशी माहिती समोर आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

    पोलिसांनी तातडीने कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे. तर आरोपींमध्ये तीन अल्पवयीन मुले असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.