सनकी बॅायफ्रेंडने गर्लफ्रेंडची केली हत्या, whatsapp status ला ठेवला मृतदेहाचा फोटो; लिव्ह इन रिलेशनशिपचा भयानक अतं!

चेन्नईतून एक भयानक हत्येची कहाणी समोर आली आहे .येथे प्रियकराने आपल्याच प्रेयसीची हत्या केली. एवढेच नाही तर हत्येनंतर तिचा मृतदेहाचे फोटो whatsapp status ला ठेवला.

  देशभरात महिलांच्या बाबतीत गुन्हे(Crime) घडण्याचं प्रमाण काही कमी होण्याचं नाव घेत नाही आहे. अनेकदा महिलांच्या बाबतीत या ओळखीच्या नात्याकडूनच गुन्हे होण्याचं प्रमाण वाढताना दिसत आहे. चेन्नईमधून अशीच एक धक्कादायर घटना समोर आली आहे. येथे एका 20 वर्षीय तरुणीची तिच्या बॅायफ्रेंडने हत्या केली आहे. एव्हढ्यावरचं न थांबता त्या सनकी तरुणाने हत्येनंतर तिच्या मृतदेहाचा फोटो त्याच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला ठेवला. या घटनेनंच सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.

  नेमकं काय घडलं

  मिळालेल्या माहितीनुसार चेन्नई शहरातील क्रोमपेट परिसरात असलेल्या एका हॉटेलची खोली बऱ्याच वेळपासून बंद असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांचे पथक तातडीने त्या हॉटेलमध्ये पोहोचले. तेथे रुम क्रमांक 201 उघडली असता सर्वजण थक्क झाले. पोलीस ज्या मुलीचा शोध घेत होते तिचा मृतदेह समोरच्या बेडवर पडली होती. हॉटेल मॅनेजरने सांगितले की, केरळमधील कोल्लम येथे राहणारी फौजिया तिचा मित्र आशिकसोबत येथे राहण्यासाठी आली होती. दोघेही तिथे अनेकदा यायचे. पोलिसांनी हॉटेल आणि आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले असता आरोपी आशिक जवळच्याच एका रेस्टॉरंटमध्ये गेल्याचे दिसून आले. पोलिसांनी विलंब न लावता त्या रेस्टॉरंटमधून आरोपीला अटक केली.

  आरोपीने गुन्हाची दिली कबुली

  चौकशीदरम्यान, आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिली आणि सांगितले की, प्रेयसीने त्याच्यावर दुसऱ्या महिलेशी प्रेमसंबंध असल्याचा आरोप केल्यामुळे त्यांच्यात वाद झाला. याचा राग येऊन आशिकने आपल्या टी-शर्टने तिचा गळा आवळून खून केला. मिळालेल्या माहितीनुसार, या जोडप्याला त्यांच्या किशोरवयात एक मूलही होते, ज्याला त्यांनी दत्तक देण्यासाठी सोडून दिले होते.

  एका 20 वर्षीय नर्सिंग विद्यार्थिनीची चेन्नईच्या एका हॉटेलमध्ये तिच्या प्रियकराने कथितपणे हत्या केली होती, ज्याने मृतदेहाचा फोटो व्हॉट्सअॅप स्टोरी म्हणून पोस्ट केला होता, पोलिसांनी शनिवारी सांगितले. पीडितेच्या मित्रांनी आरोपीला माहिती दिल्यावर खून उघडकीस आला