उत्तर प्रदेशमध्ये दिल्ली प्रकरणाची पुनरावृत्ती; प्रियकराकडून प्रेयसीची हत्या, शरीराचे केले 6 तुकडे

दिल्लीसारखं हत्याकांड उत्तरप्रदेशमध्ये घडलं आहे. एका प्रियकराने प्रेयसीसोबत झालेल्या वादातून तिची हत्या केली आणि तिच्या शरीराचे 6 तुकडे केले.

    उत्तर प्रदेश : मुंबईच्या श्रद्धा वालकरची दिल्लीत झालेल्ला हत्या प्रकरणाणे अख्या देश हादरला आहे. या प्रकरणी आधीच संतापाची लाट असून आता असच एक प्रकरण उत्तर प्रदेशमध्ये उघडकीस आला आहे.उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) आझमगढमध्ये (Azamgarh Crime News) काही दिवसांपूर्वी झालेल्या मुलीच्या हत्याकांडाचा उलगडा झाला आहे. प्रियकरानेच प्रेयसीची हत्या करुन तिच्या या मृतदेहाचे 5 ते 6 तुकडे केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

    काही दिवसांपुर्वी आझमगढमधील एका गावातील विहिरीत एका मुलीचा मृतदेह  छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला होता. या मृतदेहाचे 5 ते 6 तुकडे करण्यात आले होते. या प्रकरणी तपास सुरू असताना तिच्या प्रियकराने तिची हत्या केल्याचं उघडकीस आलं. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला अटक केली आहे.

    कशी झाली हत्या?

    15 नोव्हेंबरला आझमगढ जिल्ह्यातील अहरौला गौरी का पुरा गावात रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत एका तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. या मृतदेहाचे अनेक तुकडे करण्यात आले होते. या घटनेमुळे गावात भितीचं वातावरण होतं. त्यातच दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांड उघडकीस आलं होतं. पोलिसांनी तातडीने या हत्या प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांनी तिची ओळख पटवून तिच्या नातेवाईकांची आणि मित्रांची चौकशी सुरू केली, त्यानंतर हत्येचे रहस्य उलगडलं आणि आरोपीचा तपास सुरु झाला. आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर पोलीस तपासासाठी त्याच्यासह घटनास्थळी गेले. त्यावेळी त्याठिकाणी लपवून ठेवलेल्या गावठी बंदुकीतून आरोपीनं पोलिसांवर गोळीबार केला. त्यामध्येच आरोपी जखमी झाला. दरम्यान, पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत आरोपीला अटक केली. आरोपीला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. त्यानंतर या निर्घृण हत्येचा उलगडा झाला. आरोपीनं दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी मृतदेहाचं शीर ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, आरोपीनं आपल्या प्रेयसीची हत्या केल्याचा कबुली जबाब दिला आहे.