श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती! रागाच्या भरात प्रेयसीची हत्या, 200 किलोमीटर दूर जंगलात फेकलं

तरुणीचे त्याच्याव्यतिरिक्त इतर कोणासोबत तरी प्रेमसंबंध असल्याचं त्याला कळालं होतं. त्याच रागातून तरुणानं त्याच्या प्रेयसीची हत्या केल्याचं सांगण्यात येत आहे.

    छतीसगड:  मुंबईच्या श्रद्धा वालकरची दिल्लीत तिच्या प्रियकरानं हत्या केल्याची घटना ताजी असतानाच आता छत्तीसगडमधूनही अशीच एक हत्याकांडाची बातमी समोर येत आहे. वाद झाल्यानंतर रागाच्या भरात प्रियकरानं प्रेयसीची हत्या केली आहे. हत्येनंतर त्याने 200 किलोमीटर दूर जंगलात तिचा मृतदेह फेकून दिला. आरोपी प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. सचिन अग्नवाल असं आरोपीच नाव आहे.

    श्रद्धा हत्याकांडानंतर छत्तीसगडमध्ये एक हत्याकांड घडलं आहे. ज्यामध्ये प्रियकराने आपल्या प्रेयसीची निर्घृणपणे हत्या केली. सचिन अग्नवाल आणि मृतक तनु कुर्रे हे दोघही रिलेशनशीपमध्ये होते. तिला फिरायला नेण्याच्या बहाण्यानं सचिनने तिची हत्या केली. या दोघांमध्ये भांडण झालं आणि रागाच्या भरात त्याने तिच्यावर गोळ्या झाडत हत्या केली. हत्येनंतर तिचा मृतदेह जंगलात नेऊन फेकला. तरुणीचे त्याच्याव्यतिरिक्त इतर कोणासोबत तरी प्रेमसंबंध असल्याचं त्याला कळालं होतं. त्याच रागातून तरुणानं त्याच्या प्रेयसीची हत्या केल्याचं सांगण्यात येत आहे. ओदिशातील बालंगीर येथे मुलीचा मृतदेह सापडला असून आरोपीला ओदिशा पोलिसांनी अटक केली आहे.

    कुटुंबीयांच्या तक्रारीनतंर हत्या झाल्याच आलं उघडकीस

    तिचे कुटुंबीय तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. मात्र तिचा सारखा फोन बंद येत असल्याने त्यांची चिंता वाढली. घाबरलेल्या कुटुंबीयांनी नातेवाईकांनी रायपूर गाठलं आणि येथील पंडरी पोलीस ठाण्यात तनू बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर तिची हत्या झाल्याच उघडकीस आलं.