breaking news rules are being flouted dangerous travel by fewer passenger vehicle in melghat amravati nrvb

मेळघाटात दळणवळणासाठी वाहने कमी असल्यामुळे हा धोकादायक प्रवास सुरु आहे. असा नियमांना हरताळ फासून प्रवास करणं प्रवाशांच्या जीवावर बेतू शकतं. या प्रकरणी वाहतूक विभागाने (Traffic Department) अशा प्रकारच्या वाहनांकडे दुर्लक्ष केल्याने असे प्रकार अनेकदा घडताना दिसतात

अमरावती : अमरावती (Amravati) जिल्ह्यातील मेळघाटातील (Melghat) धारणी शहरात (Dharni City) वाहतूक नियमांचा (Traffic Rules) पूर्णतः फज्जा उघडल्याच चित्र उघडकीस आलं आहे, एका ५ सीटर परवाना (5 Seater Licence) असलेल्या प्रवासी वाहनात (Passenger Vehicles) जीव धोक्यात घालून वाहनाला लटकून प्रवास करतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या वाहनात क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत असल्याचे धक्कादायक चित्र मेळघाटमध्ये उघडकीस आलं आहे.

मेळघाटात दळणवळणासाठी वाहने कमी असल्यामुळे हा धोकादायक प्रवास सुरु आहे. असा नियमांना हरताळ फासून प्रवास करणं प्रवाशांच्या जीवावर बेतू शकतं. या प्रकरणी वाहतूक विभागाने (Traffic Department) अशा प्रकारच्या वाहनांकडे दुर्लक्ष केल्याने असे प्रकार अनेकदा घडताना दिसतात पण प्रशासनाला याचं काहीही सोयरसुतक नाही.