राज ठाकरेंना अयोध्येत येण्यापासून रोखणारे बृजभूषण सिंह आता अडचणीत, कुस्तीतल्या दिग्गज खेळाडूंनी केलेत लैंगिक शोषणाचे आरोप, काय प्रकरण ?

काही दिवसांपूर्वीच पुण्यात झालेल्या महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari, Pune) स्पर्धेत बृजभूषण सिंह हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांच्यासोबत व्यासपीठावर होते. उ. प्रदेशातील दबंग नेते अशी त्यांची ओळख आहे.

  नवी दिल्ली : दिल्लीच्या (Delhi) जंतर मंतर (Jantar Mantar) परिसरात भारतातील दिग्गज कुस्तीपटू (Legendary wrestlers of India) सध्या आंदोलनाला (Agitation) बसले आहेत. कुस्ती संघ त्यांचं शोषण करत असल्याचं या पेहलवानांचं म्हणणंय. भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह (Brijbhushan Singh, President of Indian Wrestling Association) हे या पेहलवानांच्या टार्गेटवर आहेत (Target On Wrestlers) . बृजभूषण सिंह हे मनमानी कारभार करत असल्याचा आरोप करण्यात आलाय.

  एशियन गेम्समध्ये (Asian Games) पदकं मिळवून देणाऱ्या महिला कुस्तीपटू विनेश फोगाट (Female Wrestler Vinesh Phogat) हिने तर बृजभूषण सिंह हे अनेक मुलींचं लैंगिक शोषण (Sexual Abuse) करत असल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. मुलींच्या वैयक्तिक आयुष्यात दखल देत मुलींना त्रासा देत असल्याचा आरोपही करण्यात आलाय. यावर प्रत्युत्तर देताना बृजभूषण सिंह यांनी हे आरोप खरे ठरले तर फासावर जाईन, अशी प्रतिक्रिया दिली आहे. आता हे प्रकरण केंद्र सरकारकडेही (Case In Central Government) गेलंय. क्रिडा मंत्रालयानं कुस्ती महासंघाला याबाबत ७२ तासांत स्पष्टीकरण देण्यास सांगितलं आहे. बृजभूषण सिंह यांच्या समर्थनार्थही काही खेळाडू पुढे सरसावल्याचं दिसतंय.

  कोण आहेत बृजभूषण सिंह?

  काही दिवसांपूर्वीच पुण्यात झालेल्या महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari, Pune) स्पर्धेत बृजभूषण सिंह हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांच्यासोबत व्यासपीठावर होते. उ. प्रदेशातील दबंग नेते अशी त्यांची ओळख आहे. उ. प्रदेशच्या गोंडा गावातील ते रहिवासी आहेत. सध्या कैसरगंज लोकसभा मतदारसंघाचे खासदारही आहेत.

  विद्यार्थी चळवळीपासून ते राजकीय नेता असा त्यांचा प्रवास आहे. बृजभूषण सिंह यांचं तरुणपण हे अयोध्येतल्या आखाड्यात गेलंय. पहेलवान म्हणून बृजभूषण सिंह स्वत:ला शक्तिशाली म्हणवून घेतात. १९९१ साली त्यांनी पहिल्यांदा लोकसभा निवडणूक जिंकली. त्यानंतर १९९९, २००४, २००९, २०१४ आणि २०१९ या निवडणुका ते सलग खासदार राहिलेले आहेत. एकूण सहा टर्म ते लोकसभा खासदार आहेत. १९८८ साली बृजभूषण सिंह यांनी भाजपात प्रवेश केला. त्यानंतर १९९१ साली रेकॉर्डब्रेक मतांनी ते खासदार झाले. २००९ च्या लोकसभा निवडणुकीआधी त्यांनी भाजपा सोडून सपाकडून खासदारकी जिंकून दाखवली. बृजभूषण सिंह २०११ पासून भारतीय कुस्तीसंघाचे अध्यक्षही आहेत. २०१९ मध्ये तिसऱ्यांदा त्यांची यापदी निवड झालीय.

  बृजभूषण सिंह यांचा प्रभाव गोंडा, बलरामपूर, अयोध्या आणि आसपासच्या जिल्ह्यांत आहे. १९९९ नंतर त्यांनी एकही लोकसभा निवडणूक हरलेली नाही. त्यांचा मुलगा प्रतीक भूषण हाही राजकारण असून गोंड्याचा भाजपाचा आमदार आहे.

  हिंदुत्ववादी नेते अशी प्रतिमा

  भआजपात आल्यानंतर हिंदुत्ववादी नेता अशी प्रतिमा बृजभूषण सिंह यांनी तयार केली आहे. अयोध्येत बाबरी ढाचा पाडण्याच्या प्रकरणातही त्यांचा सहभाग होता. या प्रकरणात आरोपी असलेल्या भाजपाच्या ४० दिग्गज नेत्यांत त्यांचाही सहभाग आहे. सप्टेंबर २०२० साली त्यांची या सर्व आरोपांतून मुक्तता झालेली आहे. राजकारणात येण्यापूर्वी ते कुस्त्यांचे सामने आयोजित करीत असत. त्यांच्यावर यापूर्वी हत्या, खंडणी, तोडफोड, मारहाणीचे अनेक आरोप करण्यात आलेले आहेत. एसयूव्ही गाड्यांचे शऔकिन अशीही बृजभूषण सिंह यांची ओळख आहे. लखनौच्या लक्ष्मणपुरी परिसरात त्यांचा मोठा बंगलाही आहे.

  राज ठाकरेंना केला होता विरोध

  गेल्या वर्षी राज ठाकरे यांनी अयोध्येला जाण्याची घोषणा केली होती. त्यावेळी याच बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंनी आधी परप्रातियांची माफी मागावी, अन्यथा अयोध्येत त्यांना पाऊल ठेवू देणार नाही, अशी भूमिका घेतली होती. त्यावरुन बदाच वादंग झाला होता. अखेरीस राज ठाकरेंनी अयोध्या दौरा रद्द केला होता. आता राज ठाकरे यांना असलेला विरोध हा वैयक्तिक नसल्याचं बृजभूषण सिंह सांगत आहेत.

  वादग्रस्त वक्तव्यांनी नेहमी चर्चेत

  १. २०२२ साली विधानसभा निवडणुकीत त्यांनी सपाला मत म्हणजे पाकिस्तानला मत असे वक्तव्य केले होते.
  २. आमच्याच पक्षात कलाम हे राष्ट्रपती होऊ शकतात. कमाल केलीत राष्ट्रपती कसाब असाल तर कापून काढू असंही ते म्हणाले होते.
  ३. ओवेसी यांचे पूर्वज हिंदू होते, त्यांच्या वडिलांचे नाव तुलसीराम दास होते.
  ४. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी आणि बिलावल भुट्टो हे एकाच वंशाचे असल्याचे वक्तव्यही केले होते
  ५. बाबा रामदेव यांच्या पतंजलीवर बनावट तूप विकण्याच्या आरोपानेही चर्चेत आले होते.