
बहिणीसोबत असलेल्या प्रेमसंबंधाचा राग मनात धरुन तरुणाने मित्रांच्या मदतीने प्रियकराला दारु पाजून रेल्वे रुळावर फेकून दिलं. या घटनेत रेल्वे अंगावरुन जाऊन गुडघ्याखालील पाय कापल्याने बहिणीचा प्रियकर गंभीर जखमी झाला आहे.
अमरावती: बहिणीचे गावातील एका तरुणासोबत असेलेले प्रेमसंबंध मान्य नसल्याने भावाने त्या तरुणाची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. बहिणीसोबत अफेयर असल्याच्या रागातून या तरुणाने मित्रांच्या मदतीने त्याला (Boyfriend) दारु पाजून रेल्वे रुळावर फेकून (Brother Try to Killed Sister Boyfriend) दिले. या घटनेत रेल्वे अंगावरुन जाऊन गुडघ्याखालील पाय कापले गेले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली तर एक आरोपी फरार झाला आहे. अजय पुंडलिकराव ठोंबरे (वय 27) असं जखमी तरुणाचं नाव आहे. तर रोहन वासुदेव यादव (वय 22 वर्ष), गणेश बाबाराव मोरे (वय 23 वर्ष) आणि धनंजय उर्फ सोनू विजय बाबर (वय 24 ) अशी आरोपींची नावे आहेत.
कुठं घडली घटना
अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे (Chandur Railway) शहरालगत असलेल्या राजना रोडवरील रेल्वे ट्रॅकवर (Railway Track) सोमवारी (5 जून) मध्यरात्रीच्या दरम्यान ही धक्कादायक घटना घडली. अजय ठोंबरे या युवकाच गावात एका मुलीसोबत प्रेमसंबंध आहेत. याबद्दल मुलीच्या भावाला माहिती मिळाली. परंतु हे प्रेमसंबंध त्याला मान्य नव्हते. याचा राग मनात धरुन त्याने इतर दोन मित्रांसोबत संगणमत करुन अजय ठोंबरले हॅाटेलमध्ये बोलवून दारु पाजली आणि त्याला लाथाबुक्याने मारहाण केली. यानंतर अजय ठोंबरे हा बेशुद्ध झाल्यानंतर तिन्ही आरोपींनी त्याला जीवे मारण्याच्या उद्देशाने जवळच असलेल्या रेल्वे रुळावर फेकले. रेल्वे ट्रॅकवर पडलेल्या अजयचे गुडघ्याखालील पाय रेल्वेमुळे कापल्याने तो गंभीर जखमी झाला.
अवध्या दोन तासात दोन आरोपींना अटक
हा युवक जखमी अवस्थेत पडलेला असल्याचं बकऱ्या चारणाऱ्याला मंगळवारी सकाळी दिसला. याची माहिती चांदूर रेल्वे पोलिसांना देण्यात आली. यानंतर जखमी तरुणाला पुढील उपचारासाठी नागपूरमधील रुग्णालयात रेफर करण्यात आले. चांदूर रेल्वे पोलिसांनी या प्रकरणाची खोलात जाऊन चौकशी केली आणि वेगाने तपास चक्रे फिरवली. अवघ्या दोन तासात आरोपी गणेश मोरे आणि धनंजय उर्फ सोनू बाबर या दोघांना ताब्यात घेतलं. या दोन्ही आरोपींनी संबंधित गुन्ह्याच्या कबुली दिली आणि संपूर्ण माहिती पोलिसांना सांगितली. तर याची तिसरा आरोपी पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.