
गेल्या महिनाभरापासून तामगाव पोलीस ठाण्यासह (Tamgaon Police Station) जिल्हाधिकारी कार्यालयाला (Collector Office) ही तक्रारी दिल्या होत्या. मात्र कारवाई होत नसल्याने शेवटी त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं.
बुलढाणा : जिल्ह्यातील अवैध धंदे (Illigal Business) बंद झाले पाहिजे, कॉफी कॅफे (Coffee Cafe) बंद करण्यात यावे. शेतकऱ्यांवरील गुन्हे (Farmers Crime) मागे घेण्यात यावे या मागणीसाठी आज जागतिक महिला दिनीच (International Womens Day) आत्मदहनाचा प्रयत्न झाला. जळगाव जामोद (Jalgaon Jamod) येथील वर्षा ताथरकर (Varsha Tatharkar) असे आत्मदहनाचा प्रयत्न (Attempted Self-Immolation) करणाऱ्या महिलेचे नाव असून गेल्या महिनाभरापासून तामगाव पोलीस ठाण्यासह (Tamgaon Police Station) जिल्हाधिकारी कार्यालयाला (Collector Office) ही तक्रारी दिल्या होत्या. मात्र कारवाई होत नसल्याने शेवटी त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं.
आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी वेळीच समयसूचकता दाखवत महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न हाणून पाडल्याने पुढील अनर्थ टळला आहे.