atm theft

चोरट्यांनी एटीएम मशीनचे डोअर गॅस कटरच्या सहाय्याने कापण्याचा प्रयत्न केला असता मशिनने पेट घेतला. एटीएम मशीन, मशीनमधील 3 लाख 98 हजार 700 रुपये जळून खाक झाले. ही घटना रविवारी मध्यरात्री अडीच ते तीनच्या सुमारास इंद्रीयणी वजन काट्याजवळ चिखली रोड येथे घडली. याप्रकरणी अमोल दिगंबर शिंदे (वय 42, रा. गणेश पेठ, पुणे) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे(Burn 3 lakh 98 thousand rupees in ATM Machine).

    पिंपरी : चोरट्यांनी एटीएम मशीनचे डोअर गॅस कटरच्या सहाय्याने कापण्याचा प्रयत्न केला असता मशिनने पेट घेतला. एटीएम मशीन, मशीनमधील 3 लाख 98 हजार 700 रुपये जळून खाक झाले. ही घटना रविवारी मध्यरात्री अडीच ते तीनच्या सुमारास इंद्रीयणी वजन काट्याजवळ चिखली रोड येथे घडली. याप्रकरणी अमोल दिगंबर शिंदे (वय 42, रा. गणेश पेठ, पुणे) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे(Burn 3 lakh 98 thousand rupees in ATM Machine).

    एचडीएफसी बँकेचे चिखली रोड येथे इंद्रायणी वजन काट्याजवळ एटीएम मशीन आहे. रविवारी मध्यरात्री चोरटे एटीएम सेंटरमध्ये घुसले. सीसीटीव्ही कॅमे-यांना ब्लॅक स्प्रे मारला. चोरट्यांनी एटीएम मशीनचा उजव्या बाजुचा एटीएम वॉल्ट सेफ डोअर गॅस कटरच्या सहाय्याने कापण्याचा प्रयत्न केला असता मशीनने पेट घेतला.

    त्यामुळे एटीएम मशीन, दोन ए सी युनिट, दोन सीसीटीव्ही कॅमेरे, लॉबी लाईट सिलींग, साईड वॉल फर्निचर, एटीएम मशीनमधील 3 लाख 98 हजार 700 रुपये जळून खाक झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस अधिक तपास करत आहेत.