केदार दिघे यांच्याविरोधात गुन्हा दाखल; पीडितेला धमकावल्याचा आरोप

केदार दिघे यांच्या मित्राने २८ जुलै रोजी सेंट रेजीस हॉटेलमध्ये मेंबरशीप घेण्याच्या बहाण्याने बोलावले होते. त्यानंतर क्लब मेंबरशीपचे पैसे देण्यासाठी रुममध्ये थांबण्यास सांगून रोहित कपूरने बलात्कार केला. त्यानंतर रोहित कपूरने त्याचा मित्र केदार दिघे याच्या मध्यस्थीने पैसे घेऊन सदर घटनेबाबत कोणालाही वाच्यता न करण्यास सांगितले. मात्र, पीडितेने याला नकार दिला. त्यानंतर केदार दिघे यांनी तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.

    मुंबई : शिवसेनेचे (Shivsena) ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे (Kedar Dighe) यांच्याविरोधात मुंबईत बलात्कार (Rape) पीडितेला धमकावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, त्यांचा मित्र रोहित कपूरविरोधात (Rohit Kapoor) बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वीच केदार दिघे यांची ठाणे जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

    मुंबईतील ना.म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात एका महिलेने तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार महिला या खासगी कंपनीत क्लब ॲम्बेसिटर म्हणून काम करतात. मुंबईत येणाऱ्या पाहुण्यांना क्लबच्या मेंबरशिपबाबत (Club Membership) माहिती देण्याचे काम करतात. केदार दिघे यांच्या मित्राने २८ जुलै रोजी सेंट रेजीस हॉटेलमध्ये (Saint Regis Hotel) मेंबरशीप घेण्याच्या बहाण्याने बोलावले होते. त्यानंतर क्लब मेंबरशीपचे पैसे देण्यासाठी रुममध्ये थांबण्यास सांगून रोहित कपूरने बलात्कार केला.

    घाबरलेल्या महिलेने या घटनेची कुठेही वाच्यता केली नाही. मात्र, त्यानंतर ३१ जुलै रोजी पीडित महिलेने सदर प्रसंग मित्रांना सांगितला. पीडितेने रोहित कपूरला व्हॉट्सॲपवर याबाबत जाब विचारला. रोहित कपूरने पीडित महिलेला व्हॉट्सॲपवर ब्लॉक केले. त्यानंतर रोहित कपूरने त्याचा मित्र केदार दिघे याच्या मध्यस्थीने पैसे घेऊन सदर घटनेबाबत कोणालाही वाच्यता न करण्यास सांगितले. मात्र, पीडितेने याला नकार दिला. त्यानंतर केदार दिघे यांनी तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.