CBI ची भ्रष्टाचाराविरोधातील आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई; गृहमंत्रालयाच्या 6 अधिकाऱ्यांसह 14 जणांना अटक

सीबीआयने 40 ठिकाणी छापे टाकून गृह मंत्रालयाच्या 6 अधिकाऱ्यांसह 14 जणांना अटक केली. सीबीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांच्याकडून अनेक आक्षपार्ह्य कागदपत्रे आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. सीबीआयने दिल्ली, हरियाणा, राजस्थान, झारखंड, हिमाचल प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, आसाम आणि मणिपूरमध्ये 40 ठिकाणी छापे टाकले होते(CBI's biggest anti-corruption operation; 14 arrested, including 6 Home Ministry officials).

    दिल्ली : सीबीआयने 40 ठिकाणी छापे टाकून गृह मंत्रालयाच्या 6 अधिकाऱ्यांसह 14 जणांना अटक केली. सीबीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांच्याकडून अनेक आक्षपार्ह्य कागदपत्रे आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. सीबीआयने दिल्ली, हरियाणा, राजस्थान, झारखंड, हिमाचल प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, आसाम आणि मणिपूरमध्ये 40 ठिकाणी छापे टाकले होते(CBI’s biggest anti-corruption operation; 14 arrested, including 6 Home Ministry officials).

    सीबीआयने छापे टाकल्यानंतर गृह मंत्रालय आणि एनआयसीच्या एफसीआरए विभागाच्या 7 लोकसेवकांसह 36 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यांच्यावर एफसीआरए विभागाचे काही अधिकारी प्रवर्तक, विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि मध्यस्थ यांच्यासोबत कट रचत होते. तसेच एफसीआरए नोंदणीकरण आणि एनजीओच्या नुतणीकरणासाठी भ्रष्ट कारवायांमध्ये गुंतले होते.

    लोकसेवक वरील पद्धतींमध्ये गुंतले होते आणि एफसीआरएअंतर्गत नोंदणीकरण व नोंदणीकरणाचे नुतनीकरण आणि इतर एफसीआरएशी संबंधित कामांसाठी संघटनांकडून लाच घेत होते. तपासादरम्यान, दोन आरोपींना गृह मंत्रालयाच्या वरिष्ठ लेखापालाकडून चार लाख रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले. हवाला ऑपरेटरच्या माध्यमातून लाचेची रक्कम स्वीकारण्यात येत असल्याचा आरोप होता.