
दहिसर येथे मुंबई अग्निशमन दलातर्फे भरती सुरू झाली आहे. महिलांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत होती. या भरतीसाठी मुंबईसह राज्यातील विविध भागातून तरुणी आल्या होत्या. गेल्या दोन दिवसांपासूनच या तरुणींनी मुंबईत ठाण मांडून होत्या. आज त्या भरतीसाठी मैदानात दाखल झाल्या होत्या.
मुंबई: दहिसर (Dahisar) येथे मुंबई अग्निशमन दलातर्फे (Mumbai Fire Brigade) भरती (Recruitment) सुरू झाली आहे. महिलांसाठी सुरू असलेल्या या भरती दरम्यान प्रचंड गदारोळ झाला आहे. काही तरुणींना भरतीत अपात्र ठरवण्यात आल्याने या तरुणींना संताप अनावर झाला आहे (Some young women have been disqualified for recruitment, which has angered these young women). हा संताप इतका होता की त्यांनी मैदानातच जोरदार आंदोलन सुरू केलं (They started a strong protest in the field itself). आपल्यावर अन्याय झाल्याचं सांगत या तरुणींनी जोरदार घोषणाबाजीही केली.
या तरुणी अचानक आक्रमक झाल्याने भरती प्रक्रिया थांबली. त्यामुळे या आंदोलक तरुणींना मैदानातून हुसकावून लावण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. पण या तरुणी अधिकच आक्रमक झाल्याने पोलिसांना त्यांच्यावर सौम्य लाठीमारही करावा लागला. यावेळी अनेक तरुणींच्या पायाला, हाताला आणि डोक्याला मार लागला. त्यामुळे येथील वातावरण अधिकच तापले होते.
दहिसर येथे मुंबई अग्निशमन दलातर्फे भरती सुरू झाली आहे. महिलांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत होती. या भरतीसाठी मुंबईसह राज्यातील विविध भागातून तरुणी आल्या होत्या. गेल्या दोन दिवसांपासूनच या तरुणींनी मुंबईत ठाण मांडून होत्या. आज त्या भरतीसाठी मैदानात दाखल झाल्या होत्या. पण यावेळी त्यांच्या उंचीचं कारण देऊन त्यांना अपात्र ठरविण्यात आलं.
बीएमसी हाय हायच्या दिल्या घोषणा
अग्निशमन दलाने घालून दिलेल्या उंचीच्या नियमापेक्षा अधिक उंची असूनही या तरुणींना डावलण्यात आलं. त्यामुळे या तरुणींचा संताप अनावर झाला आणि त्यांनी आंदोलन सुरू केलं. या तरुणींनी महापालिका हाय हाय, बीएमसी हाय हायच्या घोषणा दिल्या. सर्वच तरुणींनी मैदानात येऊन जोरदार घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यामुळे भरती प्रक्रिया थांबली. या परिसरात अचानक गोंधळ झाल्याने पोलिसांनी या तरुणींना पांगवण्यासाठी त्यांच्यावर लाठीमार केला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला.
भरती प्रक्रिया रद्द करण्याची मागणी
पोलिसांनी आमच्या पायावर, गुडघ्यावर हातावर लाठीमार केला. आमच्या डोक्यालाही मार लागला. आमचं डोकं दाबण्यात आलं, असा आरोप या तरुणींनी केला तसेच आम्ही शेतकऱ्यांच्या मुली आहोत. आम्ही दोन दिवसांपासून येथे आलो. आमची उंची असतानाही आम्हाला डावलण्यात आलं आहे. हा आमच्यावर अन्याय असून ही भरती प्रक्रियाच रद्द करा. पोलिसांकडून ही भरती प्रक्रिया राबवा, अशी मागणी या तरुणींनी केली.
तरीही डावललं असल्याची व्यक्त केली खंत
१६२ सेंटीमीटर उंची असावी अशी अग्निशमन दलाने अट घातली आहे. पण आमची उंची त्यापेक्षा जास्त असूनही आम्हाला भरती प्रक्रियेतून डावलण्यात आलं. हा आमच्यावर अन्याय आहे, असं या तरुणींनी सांगितलं. तुम्हाला हीच भरती प्रक्रिया आहे का? असा उद्धट सवाल आम्हाला अधिकाऱ्यांकडून करण्यात आल्याचा दावाही या तरुणींनी केला.