फ्लॅट विकण्याचे सांगून 12 लाखांची फसवणूक

फ्लॅट विकण्याचे सांगून त्याचा रीतसर व्यवहार करून 12 लाख रुपये घेतले. त्यांनतर तो फ्लॅट अन्य व्यक्तीस विकून पैसे घेतलेल्या व्यक्तीची फसवणूक केली असल्याचा प्रकार खराळवाडी पिंपरी येथे उघडकीस आला. हा प्रकार सन 2019 ते 6 जून 2022 या कालावधीत घडला.

    पिंपरी:  फ्लॅट विकण्याचे सांगून त्याचा रीतसर व्यवहार करून 12 लाख रुपये घेतले. त्यांनतर तो फ्लॅट अन्य व्यक्तीस विकून पैसे घेतलेल्या व्यक्तीची फसवणूक केली असल्याचा प्रकार खराळवाडी पिंपरी येथे उघडकीस आला. हा प्रकार सन 2019 ते 6 जून 2022 या कालावधीत घडला.

    अफजल दाऊद कुरेशी (वय 36, रा. वैशालीनगर, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोहम्मद रफिक अब्दुलगणी दफेदार (वय 57), अल्ताफ अहमद मेहबूब मन्नूर (वय 58, दोघे रा. घोरपडीगाव, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एम डी डेव्हलपर्सचे बिल्डर आरोपी यांनी त्यांची खराळवाडी पिंपरी येथील नवाजीश पार्क या बांधकाम साईटवरील दुस-या मजल्यावरील एक फ्लॅट फिर्यादी यांना 20 लाख 20 हजार रुपयांना विकण्याचे ठरवले. त्यासाठी फिर्यादीकडून चेक व रोख स्वरूपात 12 लाख रुपये घेतले. फ्लॅटची नोंदणी फिर्यादी यांच्या नावावर न करता फ्लॅटसाठी फिर्यादी यांनी दिलेले 12 लाख रुपये त्यांना परत न करता वसीम पाचूलाल पठाण व त्यांची पत्नी शबनम वसीम पठाण (रा. निगडी) यांना तो फ्लॅट विकला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.