जयपूरमध्ये विकृतीचा कळस! मार्बल कटरने महिलेच्या मृतदेहाचे 10 तुकडे; आरोपी गजाआड

    दोन महिन्यापासून श्रध्दा हत्याकंडने संपूर्ण जग हदरले असताना, राजधानी जयपूरमध्ये श्रध्दा हत्याकंदची पूर्नवृत्ती झाली आहे, जयपूरमध्ये महिलेची निर्घृण हत्या करून मृतदेहाचे तुकडे फेकल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ही घटना विद्याधर नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. सरोज शर्मा या कॅन्सरने ग्रस्त 60 वर्षीय महिलेच्या बेपत्ता प्रकरणाच्या तपासादरम्यान हत्येचे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणाचा खुलासा करताना डीसीपी उत्तर परिष देशमुख यांनी सांगितले की, 11 ऑगस्ट रोजी अनुज शर्मा यांनी विद्याधर नगर पोलिस ठाण्यात त्यांची ताई सरोज शर्मा मंदिरात जाऊन घरी न परतल्याबद्दल तक्रार दिली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिस जेव्हा पीडितेच्या घरी पोहोचले तेव्हा पोलिसांना संशय आला. 13 डिसेंबरला अनुज स्वतः हरिद्वार आणि दिल्लीला गेल्याचे तपासात उघड झाले. दिल्लीहून परतल्यावर पोलिसांनी लोकेशनच्या आधारे अनुजचा माग काढला आणि त्याला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपी अनुजने गुन्ह्याची कबुली दिली.

    11 डिसेंबर रोजी अनुजच्या घरातील इतर सदस्य काही कामानिमित्त बाहेर गेले होते. अनुज हा बीटेक धारक असून तो हरे कृष्ण चळवळीशी बराच काळ संबंधित होता आणि भजन कीर्तन करत असे. अनुज देखील त्याच्या कर्करोगग्रस्त ताई सरोजची घरी सेवा करत असे. परंतु 11 डिसेंबर रोजी त्याने त्याच्या ताईला धार्मिक कार्यक्रमासाठी दिल्लीला जाण्याची परवानगी मागितली, तेव्हा तिने नकार दिला. रागाच्या भरात अनुजने ताईच्या डोक्यात लोखंडी हातोड्याने वार करून तिची हत्या केली. ताईच्या हत्येनंतर पोलिसांपासून वाचण्यासाठी त्यांनी सिकर रोडवरील एका दुकानातून मार्बल कटर विकत घेतले. ताईच्या मृतदेहाचे अनेक तुकडे केले. तुकडे सुटकेसमध्ये भरले आणि कारमध्ये दिल्ली रोडला जाऊन जंगलात फेकून दिले.

     

    जयपूर पोलिसांनी सांगितले की, हत्येची घटना 11 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 च्या सुमारास घडली. हत्येच्या दिवशी तो दिल्लीला जाणार होता. मयत सरोज देवी यांनी त्याला अडवले. यावरून मारेकरी अनुजला राग आला. रागाच्या भरात त्याने सरोज देवीची हातोड्याने हत्या केली. यानंतर त्याने चाकूने मृतदेह कापण्याचा प्रयत्न केला. हाडे कापली नाहीत म्हणून त्याने बाजारातून मार्बल कटर आणले. यानंतर त्याने बाथरूममध्ये मृतदेहाचे तुकडे केले. त्यानंतर तीन ते चार तास तो मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करत होता.  प्राथमिक तपासात आरोपी अनुज हा त्याच्या ताईवर लहानपणापासूनच राग होता. घटनेच्या दिवशीही घरी इतर कोणी नातेवाईक नव्हते. यावेळी अडवणूक केल्याचा राग आल्याने त्याने ताईची हत्या करून मृतदेहाचे अनेक तुकडे करून जंगलात फेकून दिले. सध्या पोलीस आरोपींची कसून चौकशी करत आहेत.