प्रेमात वेड्या बहिणीचा खूनी कट, हत्येनंतर भावाचा मृतदेह सरकारी क्वार्टरमध्ये पुरला, पुढे काय घडलं वाचा सविस्तर

झारखंडमध्ये त्या दिवशी पत्रातू येथील पंच मंदिर परिसरातील एका घरात न्याय दंडाधिकारी, पोलीस, फॉरेन्सिक टीमसह अनेक सरकारी कर्मचारी उपस्थित होते. न्याय दंडाधिकारी आणि पोलिसांच्या देखरेखीखाली कामगार घराच्या एका खोलीत फरशी फोडत होते.

  झारखंड : एक मुलगी एका मुलावर प्रेम करत होती. हा प्रकार मुलीच्या भावाला कळला. त्याने बहिणीला समजावले पण बहिणीने त्याचे ऐकले नाही. यानंतर भावाने बहिणीची अडवणूक करण्यास सुरुवात केली. बहिणीला याचे वाईट वाटू लागले. मग एके दिवशी मुलीचा भाऊ अचानक कुठेतरी गायब झाला. अडीच महिने त्याची काहीच माहिती नव्हती. मात्र त्यानंतर हा मुलगा सापडल्यानंतर पोलिसही अवाक् झाले. मुलगा इतरत्र कुठेही सापडला नाही, तो आढळला त्याच्याच बहिणीच्या खोलीत पण जमिनीवर नाही तर जमिनीच्या खाली.

  पंच मंदिर, पत्रातू, झारखंड

  झारखंडचा हा भाग सामान्यतः शांत असतो, पण त्या दिवशी पत्रातू येथील पंच मंदिर परिसरातील एका घरात न्याय दंडाधिकारी, पोलीस, फॉरेन्सिक टीमसह मोठ्या प्रमाणात सरकारी कर्मचारी उपस्थित होते. न्याय दंडाधिकारी आणि पोलिसांच्या देखरेखीखाली कामगार घराच्या एका खोलीत फरशी फोडत होते. यानंतर त्यांनी जमीन खोदण्यास सुरुवात केली आणि सुमारे दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर खोदकाम पूर्ण झाले आणि खोलीच्या जमिनीत जे दृश्य दिसले ते थक्क करणारे होते.

  लोकांना बसला धक्का

  होय, खोलीच्या आतल्या जमिनीखाली एक मृतदेह सापडला होता. तो कुजलेला माणसाचा मृतदेह होता . पण हे कसे शक्य झाले? एखाद्याचा मृतदेह निवासी भागात, घराच्या आत, जिथे लोक राहतात तिथे कसे पुरले जाऊ शकते? त्यामुळे जेव्हा या मृतदेहाचे आणि या मृत्यूचे गूढ उलगडले, तेव्हा संपूर्ण झारखंडमधील पत्रातू येथील लोकांना धक्काच बसला.

  ३० जून रोजी बेपत्ता झाला होता रोहित

  हे प्रकरण २४ जून २०२२ पासून सुरू होते. ही तारीख आहे जेव्हा पत्रातूच्या बर्टुआ गावात राहणारा २१ वर्षीय रोहित कुमारने आपल्या मामाच्या घरी जाण्यासाठी रांचीमधील घर सोडले होते. तो जवळपास एक आठवडा तिथेच राहिला, पण नंतर अचानक ३० जून २०२२ रोजी तो गूढपणे कुठेतरी गायब झाला. ३० जून रोजी त्याचा मोबाईल बंद झाला तो कायमचाच.

  पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही

  दुसरीकडे रोहितचा शोध लागल्यावर कुटुंबीय अस्वस्थ झाले. यानंतर रांचीच्या नातेवाइकांनी पत्रातू येथे राहणाऱ्या त्याच्या पालकांना मुलगा अचानक बेपत्ता झाल्याची माहिती दिली. यानंतर रोहितचे वडील नरेश महतो यांनी प्रथम आपल्या मुलाची बेपत्ता झाल्याची तक्रार पत्रातू पोलिसांकडे केली, परंतु पोलिसांना हे रांचीतील प्रकरण असल्याचे सांगत याकडे फारसे लक्ष देण्याची गरज वाटली नाही. यानंतर दिवस, आठवडे आणि मग महिने गेले, पण रोहितचा काहीच पत्ता लागला नाही आणि पोलिसांनीही याबाबत कोणतीही कारवाई केली नाही.

  बहिणीशी झालं होतं अखेरचं बोलणं

  हरवल्यानंतर कुटुंबीयांनी आता रोहितच्या बेपत्ता झाल्याची तक्रार रांचीच्या चुटिया पोलीस ठाण्यात नोंदवली, जिथून तो गायब झाला होता. मात्र पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केल्यावर त्याचा तपासही रांचीच्या चांदनी चौक बसस्थानकावर येऊन थांबला. कारण चांदणी चौक बसस्थानकापर्यंत रोहितचा मोबाईल चालू होता, मात्र त्यानंतर त्याचा फोन बंद झाला होता. अशा परिस्थितीत पोलिसांनी रोहितच्या मोबाईलचा सीडीआर म्हणजेच कॉल डिटेल रेकॉर्ड काढला आणि तपास सुरू केला.

  भावाचा शोध घेण्यासाठी बहिणीने नोंदविली तक्रार

  पण त्यातूनही पोलिसांच्या विशेष काहीही हाती लागलं नाही, त्या दिवशी त्याचं त्याची बहीण चंचला कुमारीशी अखेरचं बोलणं झालं होतं. पत्रातू येथील रहिवासी असलेल्या चंचला, तिच्या भावाच्या या गूढ बेपत्ता होण्याने स्वत: खूपच आश्चर्यचकित झाली होती आणि कोणत्याही परिस्थितीत तिच्या भाऊला शोधण्यासाठी ती पोलिसांकडे विनवणी करत होती.

  बहिणीचं प्रेम प्रकरण झालं उघड

  पोलिसांनी अथक प्रयत्न करूनही रोहितबद्दल काहीही माहिती नव्हती, ना त्याच्या बेपत्ता होण्यामागे कोणतेही वैर, पैशाची देवाणघेवाण असे कोणतेही कारण नव्हते. आता पोलिसांनी त्याच्या संपूर्ण कुटुंबाची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. या प्रयत्नात रोहितची मोठी बहीण चंचला कुमारी हिचे एका मुस्लिम मुलासोबत प्रेमसंबंध असल्याचे पोलिसांना समजले, ज्याला रोहित विरोध करत होता.

  चंचलाने तिचा गुन्हा कबूल केला

  या प्रकरणाबाबत पोलिसांच्या संशयाची सुई चंचला यांच्याकडे वळली. आता पोलिसांनी तिची कडक चौकशी करण्याबरोबरच तिच्या सीडीआरचीही चौकशी केली आहे आणि तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की रोहित बेपत्ता झाला त्या दिवशी चंचला स्वतः पत्रातूहून रांचीच्या चांदनी चौक बस स्टँडवर त्याला घेण्यासाठी आली होती. या पुराव्यांसह पोलिसांनी चंचलाची कोंडी केल्यानंतर तिने आपला गुन्हा मान्य केला.

  प्रियकराच्या मदतीने भावाच्या मृतदेहाची लावली विल्हेवाट

  रोहितची बहीण चंचलाने पोलिसांना सांगितले की, याच कटात आधी तिच्या भावाला रांचीहून पत्रातू येथे नेले, त्यानंतर त्याच्या जेवणात झोपेच्या गोळ्या मिसळून त्याचा जीव घेतला. यानंतर प्रियकर इस्रायल अन्सारीसोबत दोन दिवस ती मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करत होती. त्यानंतर आपल्या सरकारी क्वार्टरच्या एका खोलीत खड्डा खणून त्यात तिने भावाचा मृतदेह पुरला.

  पत्रातूला गेल्यानंतर उलगडले खुनाचे रहस्य

  भावाचा मृतदेह जमिनीत पुरल्यानंतर चंचला दीड महिना त्याच घरात राहिली, पण त्याची कोणीही दखल घेतली नाही. रोहित बेपत्ता झाल्याचा तपास करणारे रांची पोलिस जर पत्रातूपर्यंत पोहोचले नसले तर हे रहस्यही बाहेर आलेच नसते. त्यामुळेच असे म्हणतात की गुन्हेगार कितीही हुशार असला तरी एक ना एक दिवस तो कायद्याच्या कचाट्यात सापडतोच. पोलिसांनी चंचला आणि तिच्या प्रियकराला अटक करून दोघांचीही तुरुंगात रवानगी केली आहे.