
यापुर्वीही मार्च 2021आहुजा कन्स्ट्रक्शन्सचे दोन संचालक जगदीश भगवानदास आहुजा आणि त्यांचा मुलगा गौतम आहुजा यांना चेक बाऊन्स केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती
मुंबई: मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW ) बांधकाम व्यावसायिक जगदीश आहुजा यांना पंजाबमधून अटक केली आहे. आर्थिक फसवणुक केल्याच्या 3 प्रकरणात पोलीसांकडून त्यांचा शोध सुरू होता. अखरे मुंबई पोलिसांनी जगदीश आहुजाला अटक केली आहे. त्याचा मुलगा गौतम आहुजा अद्याप फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कोण आहे जगदीश आहुजा आणि गौतम आहुजा
जगदीश आहुजा आणि गौतम आहुजा हे दोघ पिता-पुत्र बांधकाम व्यावसायिक आहे. या दोघांनी खोटी आश्वासने देऊन अनेक लोकांची कोट्यवधींची फसवणूक केली आहे. रिअल इस्टेट प्रकल्पात केलेल्या गुंतवणुकीवर परतावा देण्याच आमिष देऊन अनेक लोकांची फसवणूक केल्याचा आरोप या यांच्यावर करण्यात आला आहे.
यापुर्वी झाली होती कारवाई
यापुर्वीही मार्च 2021आहुजा कन्स्ट्रक्शन्सचे दोन संचालक जगदीश भगवानदास आहुजा आणि त्यांचा मुलगा गौतम आहुजा यांना चेक बाऊन्स केल्याप्रकरणी निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स अॅक्टच्या कलम १३८ अन्वये प्रलंबित दोषी आढळल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. दरम्यान, या प्रकरणात त्यांना सहा महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. या दोघांनी संबधीत व्यक्तीकडून 10 लाखांचे कर्ज घेतले होते आणि अपुऱ्या निधीमुळे बाऊन्स झालेला धनादेश दिला होता. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली होती.