मराठा समाजाविषयी वादग्रस्त वक्तव्य; निलंबीत पोलीस निरीक्षकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी विनोद देशमुख यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात एलसीबीचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. बकाले यांना निलंबित करून नाशिक येथे हजर होण्यास सांगण्यात आले होते. मात्र, हजर न होता त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

    जळगाव : मराठा समाजाविषयी (Maratha Community) आक्षेपार्ह वक्तव्य (Offensive Statement) केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात जिल्‍हापेठ पोलिसांनी (JilhaPeth Police) न्यायालयाच्या कामकाजानंतर वाढीव कलम लावण्यात आली आहेत. बकालेची (PI Bakale) ऑडिओ क्लिप व्हायरल (Audio Clip Viral) करणारा हजेरी मास्तर सहाय्यक फौजदार अशोक महाजन यालादेखील सहआरोपी करण्यात आले आहे. दरम्यान, जिल्‍हा न्यायालयात सुरू असलेल्या अटकपूर्व जामिनावर आज निकाल होऊन न्यायालयाने जामीनअर्ज फेटाळला.

    मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी विनोद देशमुख यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात एलसीबीचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. बकाले यांना निलंबित करून नाशिक येथे हजर होण्यास सांगण्यात आले होते. मात्र, हजर न होता त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर न्यायाधीश बी. एस. धिवरे यांच्या न्यायालयात दोन्ही बाजूने प्रदीर्घ युक्तिवाद होऊन न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता.

    आज अखेर न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्याचा निर्णय दिला. यामुळे बकालेंच्या अडचणीत वाढ होणार असून मराठा समाजातर्फे त्यांच्या अटकेची मागणी जोर धरू लागली आहे. आज पुन्हा या गुन्ह्यात कलम वाढविण्यात आले असून बकाले फोनवर संभाषण करीत असलेला आणि ऑडिओ क्लिप व्हायरल करणाऱ्या निलंबित हजेरी मास्तर अशोक महाजन यालादेखील सहआरोपी करण्यात आले आहे.