क्षुल्लक कारणावरून कपलचं भांडण, संतप्त बॅायफ्रेंडचा गर्लफ्रेंडला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न

क्षुल्लक वादातुन झालेल्या वादानंतर तरुणाने पीडित तरूणीला वर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. यात तरुणी गंभीर रित्या भाजली अजून तिला तातडीने सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

    मुंबई: दोन दिवसापुर्वी प्रेमसंबधातून झालेल्या भांडणातून प्रियकरानं प्रेयसीची निघृणपणे हत्या केल्याची घटना ताजी असतानाच आता मुंबईतुनही एक धक्कादायक घटना समोर येत आहे. मुंबईतील धारावी ( Dharavi Crime) परिसरात प्रियकरानेच प्रेयसीला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना (boyfriend try to killed his girlfriend) उघडकीस आली आहे. या घटनेत तरुणी ६०% ते ७०% भाजली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  ४१ वर्षीय आरोपी नंदकिशोर पटेल याला पोलिसांनी अटक केली आहे.

    नेमकं प्रकरण काय?

    मिळालेल्या माहितीनुसार, एक कपल धारावी परिसरात लिव्ह-इन मध्ये राहत होते. काल दोघांमध्ये क्षुल्लक गोष्टीवरुन वाद झाला. मात्र, हा वाद इतका वाढला की संतावलेल्या तरुणाने त्याच्या गर्लफ्रेंडला मारण्याचा प्रयत्न केला. त्याने पीडित तरूणीला वर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. यात तरुणी गंभीर रित्या भाजली अजून तिला तातडीने सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या धक्कादायक घटनेनं संपूर्ण धारावी हादरून गेली आहे.

    या प्रकरणी आरोपी नंदकिशोर पटेल याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल केला आहे. तर या प्रकरणी १६ वर्षीय मुलाला देखील ताब्यात घेतले आहे.