दोन मुलांची आई प्रियकरासोबत OYO हॅाटेलमध्ये गेली; 7 तास होते सोबत, त्यांनतर दोघंही आढळले मृतावस्थेत!

दिल्लीतील मौजपूर मेट्रो स्टेशनजवळील जाफ्राबाद येथील ओयो हॉटेलमध्ये शुक्रवारी एका प्रेमी युगुलाचा मृतदेह आढळला. महिलेचं लग्न झालं असून तिला दोन मुलं आहेत.

    ईशान्य दिल्लीतील मौजपूर मेट्रो स्टेशनजवळील जाफ्राबाद येथील ओयो हॉटेलमध्ये शुक्रवारी एका प्रेमी युगुलाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. सोहराब (28) आणि आयशा (27) अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. पोलिसांनी खोलीतून एक सुसाईड नोटही जप्त केली असून त्यामध्ये दोघांनी आत्महत्या केल्याचे लिहिले आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, सोहराब आणि आयशा यांचे एकमेकांवर खूप प्रेम होते, पण ती महिला आधीच विवाहित होती आणि त्यांना दोन मुले होती. शुक्रवारी दुपारी 1.02 वाजता या जोडप्याने हॉटेलमध्ये चेक इन केले आणि संध्याकाळपर्यंत ते बाहेर पडले नाहीत. हॉटेल कर्मचाऱ्यांनी खोलीचा दरवाजा ठोठावला असता आतून आवाज आला नाही. सायंकाळी ७.४५ वाजेपर्यंत त्यांनी वेटर्सना प्रतिसाद न दिल्याने हॉटेल कर्मचाऱ्यांनी पोलिसांना कळवले.

    पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, खोलीची तपासणी केली असता, आयशाच्या शेजारी पलंगावर हिंदीत लिहिलेली अर्धा पानांची सुसाईड नोट सापडली, ज्यामध्ये दोघेही एकमेकांवर प्रेम करतात आणि आत्महत्या करत असल्याचे लिहिले होते. त्यांनी एकत्र आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला होता. स्थानिक पोलिसांसह गुन्हे पथक आणि एफएसएल पथकाने घटनास्थळी जाऊन तपास केला. शवविच्छेदनाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल.