दैव बलवत्तर म्हणून…आंबिवली रेल्वे स्थानकात ‘तो’ तिकिट तपासणी करत असताना घात झाला; ब्लेडने वार केला प्राणघातक हल्ला; आरोपी फरार

सुनील गुप्ता जखमी झाल्याने त्यांना उपाचारार्थ कल्याणच्या रेल्वे हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. संदर्भीत घटनेमुळे रेल्वे कर्मचारी सुरक्षा प्रश्न ऐरणीवर आला असल्याचे चित्र या निमित्ताने दिसत आहे.

    कल्याण : मध्य रेल्वेच्या (Central Railway) आंबिवली रेल्वे स्थानकात (Ambivali Railway Station) कर्तव्यावर असलेल्या तिकिट तपसणीकाने (On Duty TC) प्रवाशाकडून तिकीट मागितले (Demand Ticket) म्हणून संतप्त प्रवाशाने मानेवर ब्लेडने वार (Blade Attack) केल्याची धक्कादायक घटना घडल्याने रेल्वे कर्मचारी सुरक्षा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

    आंबिवली रेल्वे स्थानकात रेल्वे तिकिट तपासणीस सुनील गुप्ता (Sunil Gupta) हे सोमवारी सकाळी ९ वा. सुमारास रेल्वे प्रवाशांची तिकिट तपासणी करीत असताना एका रेल्वे प्रवाशाला तिकिट तपासणीसाठी तिकिटाची मागणी केली असता त्या अज्ञात रेल्वे प्रवाशाने रेल्वे तिकीट तपासणीक सुनील गुप्ता यांच्या मानेवर ब्लेडने वार करत प्राणघातक हल्ला करून तो फरार झाला.

    या हल्ल्यात सुनील गुप्ता जखमी झाल्याने त्यांना उपाचारार्थ कल्याणच्या रेल्वे हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. संदर्भीत घटनेमुळे रेल्वे कर्मचारी सुरक्षा प्रश्न ऐरणीवर आला असल्याचे चित्र या निमित्ताने दिसत आहे.

    ही घटना दुर्दैवी असून आंबिवली रेल्वे स्थानकात समाजकंटकाकडून घडणाऱ्या घटना पाहता सी सी टिव्ही यंत्रणेत वाढ करून जी आर पी तसेच आर पी एफ यांची संख्या वाढून समाजकंटकाकडून होणारे उपद्रव बंद होण्यासाठी कडक पाऊले उचलली पाहिजेत.

    – रमण तरे, पदाधिकारी, के ३ रेल्वे प्रवासी संघटना