crime-big-news-smuggling-of-counterfeit-foreign-liquor-under-the-guise-in-kalyan

पडघा मार्गावरील देवरुंग गावातील एका गोदामात बनावटी विदेशी मद्याचा साठा लपवून ठेवला असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क, कल्याण विभाग अधिकाऱ्यांना गुप्त बातमीदाराने दिली. त्या माहितीनुसार भरारी पथक आणि राज्य उत्पादन शुल्क, कल्याण विभागाच्या पथकासह भिवंडी आणि उल्हासनगर निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, विभागाच्या संयुक्त कारवाई करत २२ जानेवारी रोजी त्या गोदामावर छापेमारी केली.

  कल्याण : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (Maharashtra State Excise Department) पथकाला कपड्याच्या आडून (In Cloths) बनावट विदेशी मद्य तस्करीचा (Smuggling Of Counterfeit Foreign Liquor) पर्दाफाश करण्यात यश आले आहे. छापेमारीत (Raid) कल्याण पडघा मार्गावरील (Kalyan Padgha Marg) एका गोदामासह (Godown) कल्याणमध्ये उभ्या असलेल्या एका बीएमडब्लू कारमधून (BMW Car) राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने लाखोंचा विदेशी मद्याचा बनावटी साठा जप्त केला.

  गोदाम सील करण्यात येऊन बीएमडब्लू कार जप्त केली आहे. दोन दारू माफियांना या प्रकरणी अटक केली आहे. हनुमंत दत्तु ठाणगे, (वय ६२) संदीप रामचंद्र दावानी, (वय ३४ ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर बीएमडब्लूचा मालक तथा दारू माफियांचा मोरक्या दिपक जियांदराम जयसिंघानी हा फरार झाला आहे.

  कल्याण-पडघा मार्गावरील देवरुंग गावातील एका गोदामात बनावटी विदेशी मद्याचा साठा लपवून ठेवला असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क, कल्याण विभाग अधिकाऱ्यांना गुप्त बातमीदाराने दिली. त्या माहितीनुसार भरारी पथक आणि राज्य उत्पादन शुल्क, कल्याण विभागाच्या पथकासह भिवंडी आणि उल्हासनगर निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, विभागाच्या संयुक्त कारवाई करत २२ जानेवारी रोजी त्या गोदामावर छापेमारी केली. या गोदामात साठा केलेले दमण व हरीयाणा राज्य निर्मित तसेच महाराष्ट्र राज्यातील बनावट मद्याच्या साठ्याचे एकूण २६६ बॉक्स जप्त करण्यात आले.

  त्यानंतर पुढील तपासात प्राप्त माहितीनुसार तपास पथकाने कल्याण पश्चिम भागातील एका हायप्रोफाईल सोसायटीच्या पार्किंगमध्ये धाड टाकून त्या ठिकाणी पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या बीएमडब्लू चारमधून दमण राज्य निर्मित विदेशी मद्याचे एकूण २५ बॉक्स जप्त करण्यात आले.

  या दोन्ही छापेमारीत एकूण २९१ बॉक्स व इतर साहित्य जप्त करण्यात आले. या छापेमारीत एकूण रू. ५६, लाख ७५, हजार ६४० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. त्यानंतर तिन्ही दारू माफियांविरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (अ), (ई), ८१, ८३, ९० व १०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

  छापेमारीत जप्त केलेला मुद्देमाल हा जुन्या कपड्याच्या गोण्यामध्ये लपवून ठेवून महाराष्ट्र राज्यात आणल्याचे उघडकीस आले आहे. तसेच फ़रार आरोपी दिपक जियांदराम जयसिंघानी याच्या नावे मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यामध्ये अनुज्ञप्ती (वाईन शॉप) असल्याचे निर्दशनास आले आहे.

  crime-big-news-smuggling-of-counterfeit-foreign-liquor-under-the-guise-in-kalyan

  ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, संचालक सुनिल चव्हाण संचालक (अं.व.द.) राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य,मुंबई, जिल्हाधिकारी ठाणे अशोक शिनगारे तसेच प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त कोकण विभाग ठाणे व डॉ. निलेश सांगडे अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, कल्याण विभाग, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक ठाणे, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, उल्हासनगर व निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भिवंडी, जि ठाणे यांनी केली.

  या कारवाईत निरीक्षक संजय भोसले, नंदकिशोर एन मोरे, अनिल पवार, राजेंद्र शिरसाठ, संजय गायकवाड तसेच दुय्यम निरीक्षक पूजा रेखे, मनोज निकम, कांतीलाल कवडे, सोमनाथ कोठुळे, विजय पाटील तसेच जवान अमजत तडवी, योगेश गायकवाड, रोहन मार्टिस, नितीन लोखंडे, गणेश पाटील, रुपेश खेमनर, अर्जुन कापडे, सचिन चव्हाण, शैलेश कांबळे यांनी प्रत्यक्ष भाग घेतला. या गुन्ह्याचा पुढील तपास संजय भोसले, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, कल्याण विभाग हे करीत आहेत.

  crime-big-news-smuggling-of-counterfeit-foreign-liquor-under-the-guise-in-kalyan