crime case has been filed against the person who assaulted the mahavitaran team a female electrical assistant was also abused in ajde village dombivali

रघुनाथ बाळकु आवटे या ग्राहकाचा वीजपुरवठा थकबाकीपोटी खंडित करण्यात आला होता. मात्र, याठिकाणी परस्पर केबल जोडून वीजपुरवठा सुरू असल्याचे आढळून आले. त्यानुसार कारवाई करताना भाडेकरू असणाऱ्या आरोपी गमरे याने बाह्यस्त्रोत कर्मचारी आकाश गिरी यांना मारहाण केली व महिला विद्युत सहायक भुयारकर यांना शिवीगाळ केली.

    कल्याण : थकबाकीपोटी (Arrears) खंडित केलेला वीजपुरवठा (Interrupted power supply) सुरू आढळल्याने कारवाई (Action) करणाऱ्या पथकातील बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्याला (Outsourced Employee) मारहाण केल्याची घटना (Incident Of Assault) डोंबिवलीतील आजदे गाव (Ajde Village In Dombivli) येथे घडली आहे. तर पथकातील महिला विद्युत सहाय्यकालाही शिवीगाळ करण्यात आली. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात (Manpada Police Station) सरकारी कामात अडथळा (Disruption Of Government Work) व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    नागेश धर्मदास गमरे (समर्थ दर्शन बिल्डिंग, बी-४०३, हनुमान मंदिराजवळ, आजदे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. महिला विद्युत सहाय्यक विजया भुयारकर या बाह्यस्त्रोत कर्मचारी आकाश गिरी याच्यासह आजदे परिसरात तपासणीचे काम करत होत्या.

    रघुनाथ बाळकु आवटे या ग्राहकाचा वीजपुरवठा थकबाकीपोटी खंडित करण्यात आला होता. मात्र, याठिकाणी परस्पर केबल जोडून वीजपुरवठा सुरू असल्याचे आढळून आले. त्यानुसार कारवाई करताना भाडेकरू असणाऱ्या आरोपी गमरे याने बाह्यस्त्रोत कर्मचारी आकाश गिरी यांना मारहाण केली व महिला विद्युत सहायक भुयारकर यांना शिवीगाळ केली.

    भुयारकर यांच्या फिर्यादीवरून मानपाडा पोलिसांनी गमरे विरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपी फरार आहे. महावितरण कर्मचाऱ्यांना मारहाण व दमदाटीच्या गुन्ह्यात जबर शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे महावितरण कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा न आणता सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने (Mahavitaran) केले आहे.