ओल्या दुष्काळात केलाय पराक्रम! प्रल्हादपूर शिवारात शेतातून १ लाख ३ हजार ७०० रुपयांची गांजाची झाडे जप्त; भोकरदन पोलिसांची कारवाई

विनापरवाना प्रल्हादपूर शिवारातील शेतात गांजाची लागवड करण्यात आली होती. माहिती मिळताच भोकरदन पोलिसांनी धडक कारवाई केली आहे.

    जालना : जालना जिल्ह्यातील (Jalna District) भोकरदन तालुक्यातील (Bhokardan Tehsil) प्रल्हादपूर शिवारात (Pralhadpur Shiwar) गट क्रमांक ५१ मध्ये मका पिकाच्या बांधवर गांजाच्या झाडांची (Ganja Plants) विना परवाना लागवड केल्याची माहिती भोकरदन पोलिसांना मिळली. त्या माहितीच्या आधारे आज भोकरदन पोलिसांनी धाव घेवून घटनास्थळी छापा (Raid) टाकत धडक कारवाई केली.

    या कारवाईत गांजाची १ लाख ३ हजार ७०० रूपये किमतीची झाडे जप्त करून आरोपी दगडूबा धोंडिबा खेकाळे रा. प्रल्हादपूर यांच्यावर भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी इंदलसिंह बहुरे, स.पोलिस निरीक्षक रत्नदीप जोगदंड, पोलिस उपनिरीक्षक बजरंग कुटुंभरे आदींनी केली आहे.