अडचणी वाढल्या! राम रहीमवर धार्मिक भावना भडकावल्याचा आरोप, यूट्यूबवर व्हिडिओ रिलीज झाल्यानंतर कारवाई; नेमकं प्रकरण वाचा

बलात्कार प्रकरणात तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या गुरमीत राम रहीमवर धार्मिक भावना भडकावल्याचा आरोप आहे. याप्रकरणी जालंधर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. यूट्यूबवर प्रसारित झालेल्या व्हिडिओच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. श्री गुरु रविदास टायगर फोर्स पंजाबच्या अध्यक्षांनी राम रहीमविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पंजाबमध्ये (Punjab) जालंधर पोलिसांनी (Jalandhar Police) रोहतकच्या (Rohtak) सुनारिया तुरुंगात (Sunaria Jail) बंद असलेल्या गुरमीत राम रहीमविरुद्ध (Gurmeet Ram Rahim) धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी (Hurting Religious Sentiments Case) गुन्हा दाखल केला आहे. यूट्यूबवर (Youtube) प्रसारित झालेल्या एका प्रवचनाच्या (Preachning) संदर्भात पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या संदर्भात पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, श्री गुरु रविदास टायगर फोर्स पंजाबचे (Shri Guru Ravidass Tiger Force Punjab) अध्यक्ष जस्सी तलहान (President Jassi Talhan) यांच्या तक्रारीवरून गुरमीत राम रहीमविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत जालंधर देहाट पोलिसांचे एसपी सरबजीत सिंह बहिया यांनी सांगितले की, जस्सी तल्हान यांच्या तक्रारीवरून पटारा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यांनी सांगितले की, गुरमीत राम रहीमवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे. कलम २९५ अ अन्वये कारवाई करत पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

यापूर्वी पॅरोल संपल्यानंतर राम रहीम पुन्हा तुरुंगात

बलात्कार आणि हत्येच्या गंभीर प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या गुरमीत राम रहीमचा चाळीस दिवसांचा पॅरोल संपला असून तो पुन्हा तुरुंगात गेला आहे. राम रहीमची उत्तर प्रदेशातील बागपत येथील बर्नवा आश्रमातून रोहतकच्या सुनारिया तुरुंगात रवानगी करण्यात आली. राम रहीमला पोलिस संरक्षणात तुरुंगात नेण्यात आले. सतनाम शाह यांची जयंती साजरी केल्यामुळे राम रहीमला हा पॅरोल मिळाला आहे.

राम रहीमला वारंवार पॅरोल मिळाल्याने हरियाणा सरकारवर प्रश्न उपस्थित होत आहेत. गुरमीत राम रहीमला बलात्कार प्रकरणी १०-१० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर डेरा माजी व्यवस्थापक रणजित सिंग आणि पत्रकार रामचंद्र यांच्या हत्येप्रकरणी त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. राम रहीमवर आणखी चार गुन्हे दाखल आहेत. यापैकी एका प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे, तर पंजाबमध्ये तीन प्रकरणांची नोंद आहे.