एरंडोल येथे चोरट्यांनी ज्वेलर्सचे शटर फोडून तब्बल ‘एवढ्या’ लाखांचा माल केला लंपास; श्वांनानी दाखवला माग पण…

दुकानासमोरील लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात व गावातील सी.सी. टी.व्ही.कॅमेऱ्यात तोंडाला रुमाल बांधलेले चार चोरटे दिसत असल्याचे तसेच चोरटे इको कंपनीच्या चारचाकी गाडीत दुकानासमोर आले व त्यांनी दुकानाला गाडी आडवी लावली असल्याचे देखील सी.सी. टी. व्ही.कॅमेऱ्यात दिसत असल्याचे बोलले जात आहे.

एरंडोल : शहरातील मेन रोडवर असलेले सोन्या-चांदीचे दागिने तयार करण्याचे दुकान फोडून (Jewellery Shop Shutter Broke) अज्ञात चोरट्यांनी सुमारे अडीच लाख किमतीचा मुद्देमाल (Goods worth two and a half lakhs) पळवल्याची घटना एरंडोल शहरात (Erandol City) घडली आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की दिनांक ११ मार्च रोजी पहाटे दोन ते सव्वातीन वाजेच्या दरम्यान शहरातील प्रसाद वाघ (Prasad Wagh) यांच्या मालकीचे माऊली ज्वेलर्स (Mauli Jewellers) नामक सोन्या चांदीचे दागिने तयार करण्याचे दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडले.

दुकानाचे शटरला लावलेले कुलूप न उघडता शटर वाकवून अज्ञात चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला दुकानातील ऑर्डर साठी आलेले ५० हजार रु.किमतीचे १० ग्रॅम सोन्याचे दागिने,४५हजार रु.किमतीचे सोन्याची पॉलिश केलेले दागिने,१ लाख १० रु. हजार किमतीचे सोन्याची पॉलिश केलेल्या फुल्या,५० हजार रु.किमतीचे चांदीचे भांडे,कडे व मोड असा एकूण २ लाख ५५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.

दरम्यान दुकानासमोरील लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात व गावातील सी.सी. टी.व्ही.कॅमेऱ्यात तोंडाला रुमाल बांधलेले चार चोरटे दिसत असल्याचे तसेच चोरटे इको कंपनीच्या चारचाकी गाडीत दुकानासमोर आले व त्यांनी दुकानाला गाडी आडवी लावली असल्याचे देखील सी.सी. टी. व्ही.कॅमेऱ्यात दिसत असल्याचे बोलले जात आहे.

दुकानदार प्रसाद वाघ हे आपल्या परिवारासोबत एरंडोल येथे नागोबा मढी येथे राहतात गेल्या तीन दिवसापासून ते नातेवाईकाच्या लग्नाला नाशिक येथे गेले होते ते दि.१० मार्च रोजी रात्रीच परत आले ११ मार्च रोजी सकाळी सहा वाजता दुकाना शेजारी राहणारे सायकल मार्टचे मालक भगवान चौधरी यांनी फोन करून सदरील माहिती दिली असता ते तात्काळ दुकानावर हजर झाले त्यांनी लागलीच पोलिसांना सदर घटनेची माहिती दिली पोलिसांनी तात्काळ येऊन पंचनामा करीत चौकशी केली.

शहरातील मध्यवर्ती भागात झालेल्या चोरी बद्दल एरंडोल शहरवासीयांच्या व व्यापाऱ्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून एरंडोल पोलिसांसमोर सदर चोरट्यांना पकडण्यासाठी मोठे आव्हान उभे ठाकले आहे तरी सदर चोरट्यांना लवकरात लवकर पकडण्याची भावना जनमानसात होत आहे.

याप्रसंगी श्वान पथक शहरात दाखल झाले होते त्याने बुधवार दरवाजा पर्यंत माग दाखवला. पुढील तपास एरंडोल पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शरद बागल, अनिल पाटील, मिलिंद कुमावत, पंकज पाटील करत आहे.