
पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल , ठाण्यात घरकाम करणाऱ्या महिलेची वकिलामार्फत तक्रार दाखल
पुणे : पुण्यातील एसआयडीत नियुक्त असलेले एका आयपीएस अधिकाऱ्याविरोधात पुण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी सोशल मिडीयावर ओळख झालेल्या एका घरकाम करणाऱ्या महिलेला शरिर सुखाची मागणी केली. तसेच, त्यांना अश्लील व्हिडीओ पाठविल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
आयपीएस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाल्याने राज्य पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. आयपीएस निलेश अष्टेकर असे गुन्हा दाखल झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात ३१ वर्षीय महिलेने तक्रार दाखल केली आहे. त्यानूसार, विनयभंग व आयटी अॅक्टनुसार (सीआर. क्रमांक. २७१/२०२३) नुसार गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश अष्टेकर हे आयपीएस अधिकारी आहेत. ते सध्या राज्य गुप्तवार्ता विभागाच्या पुणे कार्यलयात नियुक्त आहेत. तक्रारदार महिला ठाणे कळवा येथे राहते. ती घरकाम करते. तिचे फेसबुकवर अकाउंड असून, या दोघांची फेसबुकद्वारे ओळख झाली होती. त्यानंतर फेसबुक त्यांचे चॅटिंग झाले. तसेच, व्हॉट्सअपद्वारेही बोलणे सुरू झाले. यानंतर त्यांनी महिलेला अश्लील मॅसेज तसेच अश्लील व्हिडीओ देखील पाठविले. त्यांना फोनवरही ते बोलत असत. त्यांनी या महिलेकडे शरिर सुखाची मागणी केली. महिला संबंधित पोलीस अधिकारी असल्याने त्या प्रचंड घाबरल्या होत्या. त्यांनी याबाबत तक्रार दिली नव्हती. परंतु, सतत कॉल येत असल्याने त्यांनी निलेश यांना ब्लॉकही केल होत. पण, नंतर महिला एका वकिल महिलेच्या संपर्कात आली. त्यानंतर त्यांनी तक्रार केली. त्यानूसार पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.