crime-to-distroy-her-husband-wife-kidnaps-her-own-child-in-sonipat-haryana

हरियाणातील सोनीपत येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका महिलेने तिच्या दोन मित्र आणि मैत्रिणीसोबत पतीला संपवण्याचा कट रचला. यानंतर तिने आपल्याच मुलाचे अपहरण केले. ही बाब उघडकीस येताच परिसरातील लोकांना धक्का बसला आहे. आरोपींची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

  नुकतीच हरियाणातील (Haryana) सोनीपतमधील (Sonipat) सेक्टर-२७ (Sector 27) पोलीस स्टेशन परिसरातील जनता कॉलनीत (Janta Colony) अपहरणाची (Kidnap) घटना समोर आली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला. यामध्ये आता एक खळबळजनक खुलासा झाला आहे. ही घटना घडवणारी महिला, तिचे दोन मित्र आणि एका साथीदाराला अटक (Arrest) करण्यात आली आहे.

  विशेष म्हणजे जनता कॉलनीत संगीता या महिलेसह तिच्या दोन मैत्रिणी संगीता आणि माया (Two Friends Sangeeta And Maya) आणि मित्र विशाल (Friend Vishal) यांनी तिच्याच मुलाच्या अपहरणाचा कट रचला. याचे कारण संगीताचा तिचा पती विजय याच्यासोबत अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. दुसरीकडे मुलंही विजयसोबतच राहत होती.

  संगीता पती विजयला उद्धवस्त करण्याच्या प्रयत्नात होती

  पतीवर चिडलेली संगीता विजयला उद्धवस्त करण्याचा प्रयत्न करत होती. म्हणूनच तिने कट रचला आणि आपल्याच मुलाचे अपहरण केले. तक्रार मिळताच सोनीपत पोलिसांनी मुलाचा शोध सुरू केला. दरम्यान, पोलिसांनी या कटात सहभागी असलेल्या सर्व आरोपींना अटक केली आणि मुलाला ताब्यात घेतलं आहे.

  आरोपींची चौकशी

  माहिती देताना एसीपी रमेश कुमार म्हणाले की, जनता कॉलनीतून एका मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार आली होती. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. चौकशीत मुलाच्या आईनेच हा कट रचल्याचे समोर आले आहे. तिचा पतीसोबत वाद सुरू होता. ती आपल्या पतीला उद्धवस्त करण्याचा प्रयत्न करत होती. सर्व आरोपींची चौकशी सुरू आहे.