नुपूर शर्मा वक्तव्य : अनेक वेबसाईट्सवर सायबर अटॅक

आंतरराष्ट्रीय हॅकर्स (International Hackers)नी भारतातल्या एका प्रमुख बँकेला लक्ष्य करण्याचा प्रयत्नही केला होता. मलेशियात (Malaysia)ल्या हॅक्टिविस्ट समूह ड्रॅगनफोर्स(Dragon Force)ने केलेल्या या सायबर हल्ल्यांमध्ये ऑनलाइन प्लॅटफॉर्म्ससोबत इस्रायलमधला भारतीय दूतावास, राष्ट्रीय कृषी विस्तार प्रबंधन संस्थान आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या ई-पोर्टलला लक्ष्य केले आहे. हॅकर्सनी साधारण ७० च्या आसपास वेबसाईट्स हॅक केल्या आहेत.

    निलंबित भाजप नेत्या (BJP Leader) नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांनी केलेल्या मोहम्मद पैगंबर यांच्या टिप्पणीमुळे आंतरराष्ट्रीय वाद उफाळून आला आहे. अनेक अरब देशांनीही याप्रकरणी विरोध दर्शवला. तर, भारतातही निषेधार्थ निदर्शने झाली आहे. दरम्यान भारतातल्या अनेक वेबसाईट्सवर आंतरराष्ट्रीय सायबर अटॅक (Cyber Attack) झाले आहेत.

    आंतरराष्ट्रीय हॅकर्स (International Hackers)नी भारतातल्या एका प्रमुख बँकेला लक्ष्य करण्याचा प्रयत्नही केला होता. मलेशियात (Malaysia)ल्या हॅक्टिविस्ट समूह ड्रॅगनफोर्स(Dragon Force)ने केलेल्या या सायबर हल्ल्यांमध्ये ऑनलाइन प्लॅटफॉर्म्ससोबत इस्रायलमधला भारतीय दूतावास, राष्ट्रीय कृषी विस्तार प्रबंधन संस्थान आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या ई-पोर्टलला लक्ष्य केले आहे. हॅकर्सनी साधारण ७० च्या आसपास वेबसाईट्स हॅक केल्या आहेत.

    याशिवाय दिल्ली पब्लिक स्कूल, भवन आणि देशातल्या अनेक मोठ्या समूहांच्या प्रमुख शिक्षण संस्थांवरही हल्ला केला. फक्त महाराष्ट्रातल्या ५० पेक्षा अधिक वेबसाईट्स हॅक करण्यात आल्या आहेत. ऑडिओ क्लिप आणि टेक्स्टच्या माध्यमातून हॅकर्सने एक मेसेज पाठवला आहे. ज्यात तुमच्यासाठी तुमचा धर्म आहे आणि माझ्यासाठी माझा धर्म आहे, असे म्हटले आहे.