सायबर चोरट्यांनी मारलाय मोठा हात, थेट Usain Bolt च्या खात्यावरच मारला डल्ला आणि १०१ कोटी हडपले? वाचा नेमकं प्रकरण

हे पैसे जमैकाच्या हुसेन बोल्टच्या खाजगी गुंतवणूक फर्मच्या खात्यात ठेवण्यात आले होते, ज्यामध्ये आता अवघे १२ हजार डॉलर्स शिल्लक आहेत. बोल्टच्या वकिलांनीही खाते हॅक झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

  जगातील सर्वात वेगवान धावपटू (Fastest Runner In The World) आणि ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता हुसेन बोल्टच्या (Olympic Gold Medalist Usain Bolt) खात्यातून सर्व पैसे गायब झाले आहेत (Bank A/C Hacked). बोल्टचे खाते हॅक झाल्याची पुष्टी त्याच्या वकिलानेही केली आहे. अहवालानुसार, ८ वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणाऱ्या हुसेन बोल्टच्या खात्यातून सुमारे १०१ कोटी रुपये गायब (Rs 101 Crore) झाले आहेत. जाणून घेऊया काय आहे हे संपूर्ण प्रकरण…

  करोडोंचा लागलाय चुना

  जगातील महान धावपटू म्हटल्या जाणाऱ्या हुसेन बोल्टला मोठा झटका बसला आहे. काही सेकंदात ८ कोटी कमावणाऱ्या या धावपटूच्या खात्यातून १०१ कोटी रुपये गायब झाले आहेत. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

  खात्यात शिल्लक आहेत अवघे १२ हजार डॉलर्स

  मिळालेल्या माहितीनुसार, हे पैसे जमैकाच्या हुसेन बोल्टच्या खाजगी गुंतवणूक फर्मच्या खात्यात ठेवण्यात आले होते, ज्यामध्ये आता अवघे १२ हजार डॉलर्स शिल्लक आहेत. बोल्टच्या वकिलांनीही खाते हॅक झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

  तपास सुरू केला

  जमैकाच्या वित्तीय सेवा आयोगाने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. ज्यात हुसेन बोल्टने फर्मला इशारा दिला आहे आणि १० दिवसांत त्याचे पूर्ण पैसे परत मागितले आहेत. तसे न झाल्यास फर्मवर फसवणुकीचा गुन्हाही दाखल होऊ शकतो.

  सर्वाधिक कमाई करणारा बोल्ट

  हुसेन बोल्टच्या कारकिर्दीकडे लक्ष द्या, त्याने ऑलिम्पिक स्पर्धेत एकूण ८ वेळा सुवर्णपदक जिंकले आहे. २०१८ मध्ये, बोल्ट सर्वाधिक मानधन घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ४५ व्या क्रमांकावर होता. त्याचा पगार सुमारे १ मिलियन डॉलर होता. त्याच वेळी, त्याची जाहिरातींमधून कमाई $ ३० दशलक्ष झाली आहे.

  ३ ऑलिम्पिक खेळांमध्ये भाग घेतला

  हुसेन बोल्टने एकूण ३ ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेतला आहे. त्यादरम्यान त्याने वैयक्तिक स्पर्धांमध्ये ८ सुवर्णपदके जिंकली आहेत. एकूण ८ सुवर्णपदके जिंकण्यासाठी केवळ ११५ सेकंद तो धावला आहे. त्याने ११९ दशलक्ष डॉलर्सची बक्षीस रक्कम जिंकली आहे म्हणजेच प्रति सेकंद या खेळाडूने ८ कोटी रुपये कमावले आहेत.