पत्नी बनून मुलीने वडिलांच्या पेन्शनचे 12 लाख उडवले! 10 वर्षांनंतर सत्य आलं समोर, आता खातेय तुरुंगाची हवा

एटाच्‍या अलीगंजमध्‍ये 10 वर्षांपासून एक मुलगी कागदोपत्री खोटेपणा करून वडिलांच्‍या पेन्‍शनच्‍या पैशांचा उपभोग घेत आहे. 2013 मध्ये वडिलांचे निधन झाले. त्यापूर्वीच आईचे निधन झाले होते. वडिलांच्या मृत्यूनंतर मुलीने आतापर्यंत सरकारची १२ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. सध्या तो तुरुंगात आहे. याप्रकरणी पुढील कार्यवाही सुरू आहे.

  पैशाच्या हव्यासापोटी आजकाल लोकं काय करतील याचा नेम नाही. कुणी पैशासाठी आपल्या कुटुंबियातील लोकांचा जीव घेतं तर कुणी जीवंत असलेल्या माणसाला मृत दाखवून त्याचे पैसे लाटतं. उत्तर प्रदेशमधून असाच एक विचित्र प्रकार समोर आला आहे. एटा येथील एका मुलीने वडिलांच्या मृत्यूनंतर अनेक वर्षे पेन्शन घेतली. मात्र, या मुलीने पेन्शन घेण्यासाठी जे काही केलं ते ऐकून अधिकारीहरी चक्रावून गेले. या महिलने नेमकं काय केलं जाणून घ्या.

  नेमंक काय प्रकरण?

  अलीगंज तहसीलच्या कुंचादयम खान परिसरातील हे प्रकरण आहे. येथे राहणारे विजारत उल्लाह खान 30 नोव्हेंबर 1987 रोजी लेखपाल पदावरून निवृत्त झाले. या दरम्यान विजारत उल्ला खानच्या पत्नी साविया यांचे काही वर्षांनी निधन झाले. त्यानंतर 2 जानेवारी 2013 रोजी विजारत यांचेही निधन झाले.

  10 वर्षापासून घेत होती पेन्शन

  मात्र त्यांची मुलगी मोहसिना परवेझ पत्नी फारूख अली यांनी पेन्शन फॉर्ममध्ये स्वत:ला विजारतची पत्नी दाखवून पेन्शन घेण्यास सुरुवात केली. 10 वर्षे कोणालाही याचा सुगावा लागला नाही. पण खोटे कधी कधी पकडले जाते. मोहसीनासोबतही असंच काहीसं घडलं. ही बाब उपजिल्हाधिकारी मानवेंद्र सिंह यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी या प्रकरणाची चौकशी केली. या महिलेला न्यायालयात हजर केल्यानंतर तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. सध्या याप्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे.

  पैशांचा केला गैरवापर

  मोहसीनाने पेन्शन फॉर्ममध्ये साविया बेगम असल्याचे दाखवून शाकियाच्या पैशांचा गैरवापर केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. वास्तविक, रजिस्ट्रार कानूनगो राज कपूर यांनी अलीगंज कोतवालीमध्ये याबाबत एफआयआर दाखल केला होता. पोलिसांनी मोहसीनाविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. ही महिला बऱ्याच दिवसांपासून फरार होती, तिला शोधण्यासाठी पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करत होते. मात्र, तीला शोधण्यात अपयश येत होत. अखेर तिला पोलिसांनी मंगळवारी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता कारागृहात रवानगी करण्यात आली.तिने आतापर्यंत 12 लाख रुपयांची पेन्शनची फसवणूक केली आहे. सध्या पोलीस याप्रकरणी पुढील कारवाई करत आहेत.