अनैतिक संबंधाला सासरा करत होता विरोध! विधवा सुनेनं प्रियकरासह मिळून केली हत्या; दोघांनाही अटक

मध्य प्रदेशातील खंडवा येथे सासऱ्याने त्याच्या विधवा सुनेला तिच्या अनैतिक संबंधाबद्दल अनेकदा टोकले त्यामुळे महिलेने प्रियकराला भेटल्यानंतर सासरची हत्या केली.

    मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील बलकवाडा पोलीस स्टेशन परिसरात अवैध प्रेमसंबंधांमुळे हत्याकांड घडलं आहे. एका विधवा सुनेने प्रियकर आणि अल्पवयीन मुलासोबत मिळून तिच्या  सासऱ्याची हत्या केली. तिचा सासरा तिला वारंवांर टोकायचा त्यामुळे संतापलेल्या सुनेने तिचा अल्पवयीन मुलगा आणि प्रियकरासह हत्येचा कट रचला आणि वायरने गळा आवळून त्याचा खून केला. (Daughter in Law Killed Father In Law) या प्रकरणी पोलिसांनी सर्व आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले. सून आणि कथित प्रियकराला न्यायालयात हजर करून कारागृहात रवानगी करण्यात आली. तर, अल्पवयीन मुलाची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली.

    नेमकं काय घडलं

    मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण हिरापूर गावाजवळील दखनीपूर नरगवेपुरा येथील आहे. येथे राहणाऱ्या सुर्लीबाई (वय 35) यांच्या पतीचे पाच वर्षांपूर्वी निधन झाले होते. गावातील रतन नावाच्या तरुणासोबत तिचे प्रेमसंबंध सुरू होते. यामुळे सुरलीबाईचे सासरे नरसिंग नरगावे (65) हे वैतागले होते. सून सुर्लीबाई आणि रतन यांचेही गावकऱ्यांनी समुपदेशन केले.मात्र त्याने गावकऱ्यांचेही ऐकले नाही.

    रतनने सुर्लीबाईच्या अल्पवयीन मुलाला वेळोवेळी पैसे देऊन मदत केली. त्यामुळे ति त्याच्याकडे आकर्षित होत गेली. त्यांचा प्रेमप्रकण संपूर्ण गावात माहित झालं. घरच्यांनाही ही बाब माहित होताच त्यांनी त्याच्या प्रेमप्रकरणाला विरोध केला. या मुद्द्यवरुन तिचा सासरा तिला नेहमी टोकत होता. त्यामुळे संतापलेल्या सुनेने  28 जुलै रोजी रतन आणि अल्पवयीन मुलाच्या साहाय्याने नरसिंग यांचा वायरने गळा आवळून खून केला.

    पोलिसांनी संशयाच्या आधारे तिघांची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. बलकवारा टीआय रामेश्वर ठाकूर यांनी सांगितले की, खुनाचा गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपींना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर करण्यात आले .तेथून महिला आणि तिच्या कथित प्रियकराची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. तर, महिलेच्या अल्पवयीन मुलाला बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.