मोठी बातमी! मंत्री छगन भुजबळांपाठोपाठ आता मंत्री धनंजय मुंडेंनाही जीवे मारण्याची धमकी

धनंजय मुंडे यांच्या परळीतील घरी धमकीचा फोन आला होता. मला 50 हजार रुपये द्या, नाहीतर मी तुम्हाला जीवे मारणार असं फोनवरुन एका अज्ञात व्यक्तीनं म्हण्टल्याची माहिती समोर आली आहे

    दोन-तीन दिवसापुर्वीच मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी पोलीस तपास सुरु असतानाच आज धमकी देणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली. हे प्रकरण ताजे असतानाच आता  भुजबळ यांच्या पाठोपाठ मंत्री धनंजय मुंडे यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. धनंजय मुंडे यांच्या परळीतील घरी धमकीचा फोन आला होता. मला 50 हजार रुपये द्या, नाहीतर मी तुम्हाला जीवे मारणार असं फोनवरुन एका अज्ञात व्यक्तीनं म्हण्टल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून अज्ञात व्यक्तीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

    सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…