दीपाली सय्यदचे पाकिस्तान-दुबई कनेक्शन; कोट्यवधी रुपये हडपल्याचा आरोप

दीपाली सय्यद यांच्या चॅरिटेबल ट्रस्टमध्ये मीदेखील ट्रस्टी होतो. दीपाली सय्यद याच्या अध्यक्ष होत्या. दीपाली सय्यद यांनी हजारो कोटी महाराष्ट्रात वाटले. ऑडिट रिपोर्टमध्ये ९ हजार रुपये निघाले. दीपाली सय्यद पैसे बाहेरून आणायच्या. दीपाली सय्यदचे पाकिस्तान-दुबई कनेक्शन पाहून मी त्यांची साथ सोडली, असा दावा भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे.

    मुंबई : अभिनेत्री दीपाली सय्यद (Deepali Sayed) यांच्यावर त्यांच्याच माजी स्वीय सहाय्यकाने (Former Personel Assistant) गंभीर आरोप केले आहेत. दीपाली सय्यद यांनी अनेकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा (Scam) घातल्याचा आरोप त्यांचे माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी केला. दीपाली सय्यद यांनी सामूहिक विवाहाच्या (Group Marriage) नावाखाली बोगस लग्न (Fake Marriage) लावली, लग्न झालेल्या जोडप्यांची पुन्हा लग्न लावून सामूहिक विवाह सोहळा आयोजित केल्याचा आरोप भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे.

    दीपाली सय्यद यांच्या चॅरिटेबल ट्रस्टमध्ये मीदेखील ट्रस्टी होतो. दीपाली सय्यद याच्या अध्यक्ष होत्या. दीपाली सय्यद यांनी हजारो कोटी महाराष्ट्रात वाटले. ऑडिट रिपोर्टमध्ये ९ हजार रुपये निघाले. दीपाली सय्यद पैसे बाहेरून आणायच्या. दीपाली सय्यदचे पाकिस्तान-दुबई कनेक्शन पाहून मी त्यांची साथ सोडली, असा दावा भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे.

    दीपाली सय्यद या राज्यामध्ये सत्तानाट्य सुरू होते, तेव्हा उद्धव ठाकरे यांच्यासोबत होत्या; पण त्यानंतर त्या शिंदे गटामध्ये प्रवेश करणार होत्या, पण अजूनही या प्रवेशाला मुहूर्त मिळालेला नाही. शिंदे गटात प्रवेश करण्याआधी दीपाली सय्यद यांनी रश्मी ठाकरे, सुषमा अंधारे आणि नीलम गोऱ्हे यांच्यावर निशाणा साधला. मुंबई महापालिकेतून मातोश्रीवर पोहोचणारे खोके कमी झाले म्हणून रश्मी वहिनी नाराज आहेत. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा आंधारे आणि निलम गोऱ्हे या चिल्लर आहेत. खऱ्या सुत्रधार तर रश्मी ठाकरे आहेत, असा घणाघात दीपाली सय्यद यांनी केला होता.