दोन मित्रांवर केले चाकूने वार, एकाचा मृत्यू, पोलिसांनी १२ तासात आरोपीला केली अटक

तरुणाची चाकूने वार करून हत्या करणाऱ्या आरोपीला दिल्ली कँट पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींनी दोन मित्रांवर चाकूने हल्ला केला होता. एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून दुसऱ्यावर दिल्ली एम्समध्ये उपचार सुरू आहेत. अटक करण्यात आलेला आरोपी हा अट्टल गुन्हेगार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) घटनेच्या १२ तासांच्या आत (Within 12 Hours) तरुणाची हत्या (Murder) करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. आरोपींकडून एक पिस्तुल आणि ७ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. आरोपीने दोन मित्रांवर चाकूने हल्ला (Knife Attack) केला होता. उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला तर दुसऱ्या तरुणावर दिल्ली एम्समध्ये (AIIMS Delhi) उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा अट्टल गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी १३ गुन्हे दाखल आहेत. २० फेब्रुवारी रोजी दिल्ली कॅंट पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की, मेहराम नगर गावात एका ४० वर्षीय व्यक्तीने विपिन (२८) आणि मानव (२३) यांना चाकूने वार करून गंभीर जखमी केले होते.

पोलिस घटनास्थळी पोहोचल्यावर समजले की दोन्ही जखमी एम्समध्ये दाखल आहेत

माहिती मिळताच कँट पोलीस ठाणे पश्चिम मेहराम नगरच्या गेट क्रमांक तीनवर पोहोचले. येथे टीमला समजले की दोन्ही जखमींना उपचारासाठी एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांचे एसआय हरी राम एम्समध्ये पोहोचले आणि जखमींची विचारपूस केली.

दोन्ही तरुणांवर धारदार शस्त्रांनी वार करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. तपासादरम्यान, घटनेच्या प्रत्यक्षदर्शीने पोलिसांना सांगितले होते की, राजकुमार नावाच्या बदमाशाने विपिन आणि मानव यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले होते. उपचारादरम्यान विपिनचा मृत्यू झाला.