
दिल्लीतील कालकाजी येथील इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून आपल्या २ वर्षाच्या मुलाला फेकल्यानंतर, वडील मान सिंह (३०) यांनी तिसर्या मजल्यावरून उडी मारली. सध्या हे दोन्ही आरोपी पिता-पुत्र उपचारासाठी रुग्णालयात दाखल आहेत.
नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीतील (Delhi Crime) कालकाजी (Kalkaji Area) परिसरातून एक धक्कादायक घटना (Shocking News) समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येथे एका व्यक्तीने रागाच्या भरात आपल्या २ वर्षाच्या मुलाला पहिल्या मजल्यावरून खाली फेकून दिले (A 2 year old son was thrown from the first floor). त्याचवेळी त्याने स्वत:ही आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. सध्या दोघेही रुग्णालयात दाखल आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील कालकाजी येथील इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून आपल्या २ वर्षाच्या मुलाला फेकल्यानंतर, वडील मान सिंह (३०) यांनी तिसर्या मजल्यावरून उडी मारली. सध्या हे दोन्ही आरोपी पिता-पुत्र उपचारासाठी रुग्णालयात दाखल आहेत.
His(accused) wife Pooja claims that she had an estranged relationship with him and used to stay at her grandmother’s home with the kids & on the day of the incident, he came to her place, he was drunk & fought with her: Delhi Police
— ANI (@ANI) December 17, 2022
दुसरीकडे, घटनेबाबत आरोपी पूजाच्या पत्नीने पोलिसांना सांगितले की, तिचे तिच्या पतीसोबतचे संबंध चांगले नसून ती आपल्या मुलांसोबत आजीच्या घरी राहत होती. घटनेच्या त्याच दिवशी मानसिंग मद्यधुंद अवस्थेत तिच्या घरी आला, तिथे त्याचे पूजासोबत कडाक्याचे भांडण झाले. असे सांगितले जात आहे की, आरोपीची पत्नी त्याच्यासोबत सासरच्या घरी परत जाण्यास तयारच नव्हती. यामुळे आरोपी चांगलाच संतापला, त्यानंतर त्याने हे टोकाचं पाऊल उचललं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल शुक्रवारी रात्री बाराच्या सुमारास कालकाजी येथील सर्वोदय कॅम्प येथे ही घटना घडली. ओखला येथे राहणाऱ्या मानसिंगचे काही वर्षांपूर्वी सर्वोदय कॅम्पमध्ये राहणाऱ्या पूजासोबत लग्न झाले होते. मानसिंगला दारू पिण्याचे व्यसन असून तो कोणताही व्यवसाय करत नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्याचं पत्नी पूजासोबत पटतच नव्हतं. मानसिंगच्या अकार्यक्षमतेमुळे, पूजा बहुतेक तिच्या माहेरच्या घरी राहायची. शुक्रवारी आरोपी मानसिंग दारूच्या नशेत सासरच्या घरी पोहोचला. यावेळी त्याने येथे चांगलाच गोंधळ घातला. पूजाने त्याच्यासोबत आपल्या घरी परत यावं अशी त्याची इच्छा होती.
मात्र पूजाने पतीसोबत घरी जाण्यास स्पष्ट नकार दिल्याने आरोपी वडिलांनी आपला मुलगा आदित्यला पहिल्या मजल्यावर नेले आणि तेथून खाली फेकले. यानंतर तो स्वत: इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर पोहोचला आणि तेथून खाली उडी मारली. सध्या पिता-पुत्राची प्रकृती चिंताजनक आहे. दोघांना AIIMS च्या ट्रॉमा सेंटरच्या ICU मध्ये दाखल करण्यात आले आहे. कालकाजी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.