पत्नीच्या प्रियकराची मर्डर, हत्या करून रेल्वे रुळांवर फेकला मृतदेह, कटात दोघांचाही होता सहभाग पण…

या हत्या प्रकरणात खुनी पतीसोबतच त्याची पत्नी म्हणजेच मृताची मैत्रीणही सामील आहे. मात्र, पोलिसांनी दोघांनाही हत्येच्या आरोपाखाली अटक केली आहे.

    राजधानीला (Delhi) लागून असलेल्या टिल्डा (Tilda) येथे खुनाचा (Murder) धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथे एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या प्रियकराला (Wife Lover)  अशी शिक्षा दिली की, ऐकून कोणाच्याही काळजाला घरं पडतील. मिळालेल्या माहितीनुसार, पत्नीच्या प्रियकराची आधी हत्या करण्यात आली आणि नंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह रेल्वे रुळांवर फेकून दिला (The body was thrown on the railway tracks).

    आश्‍चर्यकारक बाब म्हणजे या हत्या प्रकरणात खुनी पतीसोबतच त्याची पत्नी म्हणजेच मृताची मैत्रीणही सामील आहे. मात्र, पोलिसांनी दोघांनाही हत्येच्या आरोपाखाली अटक केली आहे. या हत्येप्रकरणी दोघांचीही कसून चौकशी करण्यात येत आहे.