दिल्ली पोलिसांचा हा Reel बघाच, हेल्मेटशिवाय स्कूटी चालवणाऱ्या नवरीला ‘असा’ शिकवला धडा, नेटकऱ्यांकडुन कौतुक!

व्हिडिओच्या दुसऱ्या भागात 10 जूनचे चालान दाखवले आहे. हे दोन नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ₹6,000 चा दंड दर्शविते. दिल्ली पोलिसांनी ट्विट केले की, अशा मूर्ख गोष्टी करू नका.

  इंस्टाग्राम रील ( Instagram Reel) तयार करुन नुसती हवा करणाऱ्यांची आपल्या देशात काही कमतरता नाही. पण असं करताना अनेक जण नियम धाब्यावर बसवून फक्त फेमस होण्याच्या उद्देशाने किंवा मजा म्हणून करतात. मात्र, अनेकदा अशा रिलवीरांना कारवाईला सामोर जावं लागत. दिल्ली मधूनही अशीच घटना समोर आली आहे.  हेल्मेटशिवाय स्कूटी चालवणाऱ्या एका वधूवर (Bride) कारवाई करण्यात आली आहे तसेच, दिल्ली पोलिसांना (Delhi Police) एक रिल तयार करुन नियम मोडणाऱ्यांना त्याच्यांच भाषेत समज दिली आहे. हा रिल सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.  हा रिल पाहिल्यानंतर नेटकरी दिल्ली पोलिसांच  कौतुक करताना दिसत आहे.

  नेमकं प्रकरण काय?

  रविवारी इंस्टाग्रामवर एक रील व्हायरल झालं होतं. यामध्ये एक वधू विना हेल्मेट स्कुटी चालवताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये  ‘वारी वरी जाऊ’  हे गाणं ऐकायला येत आहे. हा रिल व्हायरल झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी कारवाई करत दंड ठोठावला आहे. नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल ₹6,000 चा दंड ठोठावण्यात आला आहे. हेल्मेटशिवाय गाडी चालवल्यास ₹1,000 आणि लायसन्सशिवाय गाडी चालवल्यास ₹5,000 चा दंड ठोठावण्यात आला आहे.

  दिल्ली पोलिसांनी तयार केलं अनोख रिल

  वधूवर कारवाई केल्यानंतर, दिल्ली पोलिसांनी ट्विट केलं आहे, यामध्ये एक रिल पोस्ट करण्यात आलं असून असं करणं तुमच्यासाठी धोक्याचा आहे. अशा मूर्ख गोष्टी करू नका. असं म्हणत, रिल एडीट करुन “वारी वारी जाऊं” गाण्यानंतर ‘बेवकूफियां’ गाणे जोडलं आहे. तसेच पोलिसांनी व्हिडिओमध्ये 6000 चलनाची पावती देखील जोडली आहे.

  नियंमाचं उल्लंघन केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी केलेली ही कारवाई आणि वाहनधारकांमध्ये वाहतुक नियमांबद्दल जनजागृती करण्यासाठी पोलिसांनी लढवलेली ही शक्कल नेटकरी त्यांच कौतुक करताना दिसत आहे. यासोबतच त्यांनी अशा प्रकारे नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कारवाई होऊ शकते हे सांगितल आहे.

  यापुर्वी समोर आलेत असे प्रकरण

  अशाच एका प्रकरणात, गाझियाबाद पोलिसांनी या वर्षी जानेवारीमध्ये सोशल मिडियावर इन्फुएन्सरला 17,000 रुपये दंड ठोठावला होता. कारण त्याने रील बनवण्यासाठी हायवेवर त्याची कार थांबवली. व्हिडिओमध्ये वैशाली चौधरी खुटेल, जिचे Instagram वर 6.5 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत, रस्त्यात उभ्या असलेल्या तिच्या कारच्या शेजारी अनेक वाहने जात असताना पोज देताना दिसत आहे.