delhi shocking crime man dies after woman driving bmw car runs over him nrvb

पोलिसांनी सांगितले की, महिलेला अटक करण्यात आली असून तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच ही महिला दारूच्या नशेत होती की नाही हे स्पष्ट होईल.

    नवी दिल्ली : पश्चिम दिल्लीतील (West Delhi) मोतीनगर (Moti Nagar) भागात एका महिलेने तिची बीएमडब्ल्यू (BMW Car) एका पुरुषाच्या अंगावर घातली. या अपघातात त्या व्यक्तीचा मृत्यू (Dies) झाला आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर नोंदवला आहे (Delhi Police Lodge FIR). यासोबतच कारवाई करताना पोलिसांनी महिलेलाही अटक (Woman Arrest) केली आहे. अपघाताच्या वेळी महिलेने मद्य प्राशन (Drunk Or Not) केले होते का, याचा शोध पोलिस घेत आहेत. किराणा दुकान चालवणारे अजय गुप्ता (36) यांचा अपघातात मृत्यू झाला. रुग्णालयातून औषधे घेऊन तो घरी जात असल्याचे तपासात समोर आले आहे.

    दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना पश्चिम दिल्लीतील मोती नगर भागातील आहे. जिथे पहाटे चार वाजता एका वेगवान बीएमडब्ल्यूने एका व्यक्तीला धडक दिली. 28 वर्षीय महिला बीएमडब्ल्यू चालवत होती. अशोक विहार येथील रहिवासी असलेली आणि व्यवसायाने आर्किटेक्ट असलेली ही मुलगी कथितपणे बीएमडब्ल्यू वेगाने चालवत होती. तिने आधी जनरेटरला धडक दिली आणि नंतर गुप्ता यांना चिरडले. ग्रेटर कैलास (Greater Kailas) येथील एका पार्टीतून परतत असताना हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

    पोलिसांनी सांगितले की, महिलेला अटक करण्यात आली असून तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच ही महिला दारूच्या नशेत होती की नाही हे स्पष्ट होईल. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

    ही घटना एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्यात भरधाव वेगाने जाणारे वाहन दिसत आहे. त्याचवेळी घटनेनंतर सर्वसामान्य नागरिक या प्रसांगामुळे या ठिकाणी जमले. यासोबतच काही बघणारेही जागीच थांबले होते.