अश्लील चाळे करून व्हिडिओ रेर्कोडिंग केली आणि… महिलेसह तिघांना अटक

शहादा येथील एका नोकरदारास अश्लील व्हिडिओ कॉल करून त्याची रेकॉर्डिंग करीत बदनामी करण्याची धमकी जाळ्यात फसवून त्याचा कडून लाखोंची खंडणी मागणाऱ्या एका महिलेसह पोलिस कर्मचारी व तथाकथित पत्रकाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी तिघांना अटक झाली आहे(Demand ransom by making Pornographic Video Calls ).

    नंदुरबार : शहादा येथील एका नोकरदारास अश्लील व्हिडिओ कॉल करून त्याची रेकॉर्डिंग करीत बदनामी करण्याची धमकी जाळ्यात फसवून त्याचा कडून लाखोंची खंडणी मागणाऱ्या एका महिलेसह पोलिस कर्मचारी व तथाकथित पत्रकाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी तिघांना अटक झाली आहे(Demand ransom by making Pornographic Video Calls ).

    शहादा पोलिस ठाण्यात अश्लील व्हिडिओ कॉल करणारी महिला, तथाकथित पत्रकार अतुल रामकृष्ण थोरात व पोलिस कर्मचारी छोटू तुमडु शिरसाट यांच्याविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. त्या तिघांना अटक करण्यात आली आहे.

    तक्रारदाराला अनोळखी महिलेने भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र तक्रारदाराने यास नकार दिल्यानंतर संबंधित महिलेने तक्रारदाराला व्हिडिओ कॉल केला. अश्लील चाळे करून व्हिडिओ रेर्कोडिंग केली. यानंतर संबंधित महिला आणि पोलिस आणि तथाकथित पत्रकाराने १४ लाखाची मागणी केली. त्यातील नऊ लाख रुपये पोलिस कर्मचारी छोटू शिरसाट यांच्या मार्फत महिलेने मिळविले. त्यानंतर अतुल थोरात याने तक्रारदाराकडे ९ लाखाची मागणी केली.