दिशा सालियानच्या हत्येचा तपास CBI ने केलाच नाही! सीबीआयचा खळबळ जनक खुलासा

    मुंबई : अभिनेता सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर असलेल्या दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणी CBI ने मोठा खुलासा केला आहे. सध्या दिशा सालियान प्रकरण देशभरात चांगलच गाजत असून राज्यात एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. अशातच सीबीआयने एक निवेदन जारी करून दिशा सालियनशी संबंधित प्रकरण सीबीआयने कधीही हाताळले नसल्याचे म्हंटले आहे.

    दिशा सालियान मृत्यू प्रकरणी सध्या सीबीआयचा तपास अहवाल सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या अहवालानुसार दिशा नशेत असताना तिचा तोल गेल्याने इमारतीवरून खाली पडून तिचा मृत्यू झाल्याचे वृत्त व्हायरल होत आहे. मात्र सीबीआयने हे प्रकरण आपल्याकडे कधीही सोपवले नसल्याचे म्हंटले आहे. 8-9 जून 2020 च्या रात्री दिशाने तिच्या फ्लॅटमध्ये वाढदिवसाची पार्टी आयोजित केली होती. त्यांचे अनेक मित्रही तिथे उपस्थित होते. दिशाने तिच्या बॉयफ्रेंड आणि मित्रांसोबत भरपूर मद्यपान केले, त्यानंतर सर्वांनी जेवण केले. पार्टी संपल्यानंतर ती घराच्या बाल्कनीत उभी होती आणि अचानक तिचा तोल बिघडला आणि ती खाली पडली. डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाल्याने आणि जास्त रक्तस्त्राव झाल्याने दिशाचा मृत्यू झाला.

    दिशा सालियन प्रकरणाचा तपास एसआयटी करणार :

    महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिशा प्रकरणाच्या एसआयटी चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाशी संबंधित कोणाकडे पुरावे असतील तर ते एसआयटीला द्यावेत, असे आवाहनही त्यांनी केले आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र विधानसभेत भाजप आणि के आमदारांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र भाजप आमदार नितेश राणे आणि शिवसेनेचे (एकनाथ शिंदे गट) आमदार भरत गोगावले यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करण्याची मागणीही त्यांनी केली.

    नितेश राणे म्हणाले होते की, खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत मागणी केली आहे की, एयू नावाची व्यक्ती आदित्य ठाकरे आहे. त्यांनी रिया चक्रवर्तीला ४५ कॉल केले, आम्ही पहिल्या दिवसापासून म्हणत आहोत की सुशांत सिंग आणि दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे नाव आहे. बिहार पोलिसांनी आपल्या तपासात आदित्य ठाकरे यांचेही नाव घेतले आहे, मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा या प्रकरणात सहभाग असल्याचेही न्यायालयात नमूद करण्यात आले आहे, असे ते म्हणाले.