disha salian

8 जून 2020 दिशा सालियनचा मृत्यू रोजी झाला होता. मुंबईतील मालाड येथील गॅलेक्सी रीजेंट इमारतीच्या 14व्या मजल्यावरून 28 वर्षीय दिशा पडली होती.

    मुंबई : दिशा सालियन (Disha Salian) प्रकरणी एक मोठी अपडेट आहे. अभिनेता सुशांत सिंग राजपूतची (sushant simgh rajput) माजी मॅनेजर असलेल्या दिशाच्या मृत्यूनं एकच खळबळ उडाली होती. तिची हत्या झाल्यचा आरोप होत असताना सीबीआनं एक महत्त्वाची माहिती दिली आहे. दिशाचा मृत्यू हा अपघाती होता, असा निष्कर्ष सीबीआयने तपासानंतर काढला आहे.

    8 जून 2020 दिशा सालियनचा मृत्यू रोजी झाला होता. मुंबईतील मालाड येथील गॅलेक्सी रीजेंट इमारतीच्या 14व्या मजल्यावरून 28 वर्षीय दिशा पडली होती. द इकोनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, टॅलेंट मॅनेजर दिशा सालियनचा मृत्यू हा अपघाती मृत्यू असल्याचं सांगण्यात येता आहे. सुशांत सिंह राजपूतचा मृतदेह वांद्रे येथील भाड्याच्या घरात सापडण्याच्या पाच दिवसांपूर्वी दिशाचा मृत्यू झाल्याने सिनेसृष्टीसह सर्वांना धक्का बसला होता. या प्रकरणी आता सीबीआयने आपला निष्कर्ष दिला आहे.