Drugs worth Rs 1.5 crore seized in Mumbai

मुंबईत ड्रग्स तस्करांविरोधात एनसीबीने मोहीम तीव्र केली आहे. शुक्रवारी रात्री केलेल्या कारवाईत सुमारे दीड कोटींचा गांजा एनसीबीने जप्त केला आहे(Drugs worth Rs 1.5 crore seized in Mumbai).

  मुंबई : मुंबईत ड्रग्स तस्करांविरोधात एनसीबीने मोहीम तीव्र केली आहे. शुक्रवारी रात्री केलेल्या कारवाईत सुमारे दीड कोटींचा गांजा एनसीबीने जप्त केला आहे(Drugs worth Rs 1.5 crore seized in Mumbai).

  मुंबई अंमली पदार्थ नियंत्रण विभागाकडून करण्यात आलेल्या या कारवाईत आणखी कोणाचा समावेश आहे, याचाही तपास करण्यात येत असून ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचा मोबाईल ताब्यात घेण्यात आला आहे. त्या मोबाईलद्वारेच आता या प्रकणातील आणखी काही संशयितांचा शोध घेण्याचे काम एनसीबीकडून सुरु आहे.

  या प्रकरणात आणखी कोणाचा समावेश आहे का याचा शोध एनसीबीकडून घेण्यात येत आहे. दीड कोटीचे ड्रग्ड सापडले असल्याने या प्रकरणाचा मास्टरमाईंडचा शोध घेणे सुरु आहे.

  मुंबईतील अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने मोठी कारवाई केली आहे. एनसीबीने दीड कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईत एनसीबीने एका व्यक्तीला अटकही केली आहे. या प्रकरणात आणखी काही लोकांचा सहभाग असल्याचा संशय एनसीबीला आहे. ज्या व्यक्तीला अटक केली गेली आहे, त्या व्यक्तीची चौकशी करुन उर्वरित लोकांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

  संपूर्ण नेटवर्क ट्रेस

  संपूर्ण नेटवर्क ट्रेस करण्यासाठी अटक केलेल्या व्यक्तीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. दोन वेगवेगळ्या कारवाया करून एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आले असल्याने खळबळ उडाली आहे. एनसीबीकडून जाहीर करण्यात आलेले जे प्रसिद्धी पत्रक आहे त्यामध्ये दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री उशिरा झालेल्या या कारवाईत १७७० किलो गांजा (हायड्रोपोनिक वीड- गांजा) जप्त करण्यात आला आहे. मुंबई एनसीबीचे विभागीय अधिकारी अमित घावटे यांनी ही माहिती दिली आहे.